नंदुरबार - आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनमधून हाणीकारक अन्नपदार्थ वितरीत केले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सेंट्रल किंचन अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना २ दिवासांपूर्वी पिशवीतील दूध पिण्यासाठी वितरीत करण्यात आले. मात्र, या पिशवींवर उत्पादन तारीख आणि एक्सपायरी तारीखच छापली नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी करोडो रुपये खर्च होऊनही विद्यार्थ्यांना योग्यत्या सोयी मिळत नसल्याचे समोर आले आहे.
सेंट्रल किंचनमधून विद्यार्थ्यांना अमुल किंवा नामांकीत कंपनीचे टेट्रा पॅकचे दूधच देणे बंधनकारक आहे. मात्र, असे दूध देवून जवळपास १० हजार विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचे काम संबंधीत सेंट्रल किचन संस्था चालकाने केले आहे. या प्रकरणाची सर्वत्र माहिती झाल्यानंतर हे पिशवीतील दूध थांबवण्यात आले असून ते पिशवीतील दूध हे अमुलचा असल्याचा दावा संबंधीत संस्थेने केला आहे. या साऱ्या प्रकाराबाबत आदिवासी विकास विभागाचे अधिकारी मुग गिळून गप्प असून कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार देत आहे. संबंधीत संस्थेचे थेट मंत्रालयातच लागे बांध असल्याने या साऱ्या भयावह प्रकाराबाबत अधिकारी देखील कारवाई करण्यास धजावत नाहीत.