नंदुरबार - शहरात संचार बंदीच्या काळात मॉर्निग वॉकला फिरणाऱ्याची संख्या मोठी होती. वारंवार तोंडी सूचना देऊन देखील नागरिक मॉर्निंग वॉकला जात होते. यामुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील नंद्वाळकर यांनी वीस जणांना सकाळी ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
शहरात सकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्यांना वारंवार सूचना देऊन देखील नागरिक मोठ्या प्रमाणावर मॉर्निंग वॉकला जाताना आढळून येत होते. पोलिसांनी अनेक वेळा सूचना करून ही नागरिक संचारबंदीच्या काळात बाहेर पडत होते. यामुळे नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील नंदावाळकर यांनी सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या २० नागरिकांवर नंदुरबार शहर पोलिसात संचारबंदीचा भंग आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यांना नंदुरबार न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने प्रत्येकी २ हजार रुपयांचा दंड केला. एकूणच मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांना शिक्षा झाल्याचे लॉक डाऊन नंतर पहिली घटना आहे.