ETV Bharat / state

कोविड रूग्णांना मारहाण करत रुग्णालयाची नासधुस; तिघांना अटक - नंदुरबार कोरोना रुग्ण मारहाण

उमेश पाटील हे त्यांचा जीव वाचविण्यासाठी निम्स कोविड हॉस्पिटलमध्ये गेले असता त्याठिकाणी संशयित आरोपीनी बेकायदेशीर प्रवेश करुन कोरोना रूग्णांना मारहाण करुन दुखापत केली. तसेच नेब्युलायजर मशिन कोरोना रूग्णाच्या डोक्यावर मारुन गंभीर दुखापत केली.

Corona patients beaten up, hospital vandalized by miscreants in Nandurbar
कोविड रूग्णांना मारहाण करत रुग्णालयाची नासधुस; तिघांना अटक
author img

By

Published : Sep 23, 2020, 10:10 AM IST

नंदुरबार - ट्रकचालक असल्याचा गैरसमजुतीने एकास तिघांनी मारहाण केली. मारहाण होत असतांना संबंधित जखमी आपला जीव वाचविण्यासाठी निम्स कोविड हॉस्पिटलमध्ये पळाला असता त्याचा पाठलाग करुन हॉस्पिटलमध्ये तिघा संशयित आरोपितांनी बेकायदेशीर प्रवेश करत कोविड रूग्णांना मारहाण करुन हॉस्पिटलच्या साहित्याची नासधुस केली. याप्रकरणी तिघांविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोविड रूग्णांना मारहाण करत रुग्णालयाची नासधुस; तिघांना अटक

नंदुरबार शहरानजीक असलेल्या उड्डाणपुल बायपास रस्त्यावर आरडाओरड सुरु असल्याने उमेश गुलाबराव पाटील (रा.गोकुळधाम सोसायटी नंदुरबार) हे पाहण्यासाठी गेले असता संशयित आरोपीतांनी त्यांच्याविषयी ट्रकचालक असल्याचा गैरसमज करुन विनाकारण हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच उमेश पाटील यांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेले महेंद्र भास्कर देसले, रविंद्र जयचंद तमायचेकर, गोपाल किशोर पाटील, निलेश दगा मराठे, मयुर रविंद्र ठाकुर यांना शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी मारहाण केली.

यादरम्यान उमेश पाटील हे त्यांचा जीव वाचविण्यासाठी निम्स कोविड हॉस्पिटलमध्ये गेले असता त्याठिकाणी संशयित आरोपीनी बेकायदेशीर प्रवेश करुन कोरोना रूग्णांना मारहाण करुन दुखापत केली. तसेच नेब्युलायजर मशिन कोरोना रूग्णाच्या डोक्यावर मारुन गंभीर दुखापत केली. त्यामुळे, उमेश गुलाबराव पाटील यांच्या फिर्यादीवरुन राकेश उर्फ सुरेश देविदास सामुद्रे, रविंद्र देविदास सामुद्रे, दिपक नारायण मराठे (सर्व रा.बाहेरपुरा नंदुरबार) यांच्याविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय प्रदीप सोनवणे करत आहेत. दरम्यान, तीनही संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा : मराठा समाजाला दिलासा.. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.