नंदुरबार- जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागातदेखील कोरोना आणि जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर जोरदार जनजागृती सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. याचाच भाग म्हणून लोकसंघर्ष मोर्चाने स्थानिक आदिवासी भाषेत एक गीत तयार केले आहे. याद्वारे लोकसंघर्ष मोर्चाकडून जनता कर्फ्यूमध्ये आदिवासीबहूल बांधवांना सामील होण्याचे आवाहन केले जात आहे.
बनुबाई वसावे यांनीदेखील बोलीभाषेतून करोनाविषयी गीत तयार केले असून या गीताद्वारे जनजागृती केली जात आहे. लोकसंघर्ष मोर्चा आणि बनुबाई वसावे या दोघांनी निर्मित केलेली गीते समाज माध्यमांवर चांगलीच व्हायरल होत असून ते चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दुर्गम भागातील नागरिकांनीदेखील कंबर कसल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा- कोरोनाच्या दहशतीत रेल्वे गाड्या धावतायेत रिकाम्या; प्रवाशांची संख्या रोडावली