नंदुरबार :- ७५ वर्षात काँग्रेसने आदिवासींना फक्त विकासाचे आश्वासन दिले त्या व्यतरिक्त दुसरे काहीही दिले नाही, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. नवापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार भरत गावित यांची नवापूर येथे जाहीर सभा होती. या सभेत बोलताना अमित शाह यांनी सदर प्रतिक्रिया दिली.
यावेळी अमित शाह म्हणाले कि, ३७० कलम शिवाय देशातील मागास आदिवासी जिल्ह्यांच्या विकासासाठी पंतप्रधान कार्यालयाने थेट कार्यक्रम हाती घेतला आहे. पंतप्रधानांनी आदिवासी जिल्ह्यांना विकासासाठी दत्तक घेतले आहे. ७५ वर्षात काँग्रेसने आदिवासींना फक्त विकासाच्या आश्वासनाशिवाय दुसरे काही दिले नसल्याचा आरोप अमित शाह यांनी सभेत केला आहे. त्याचबरोबर, सभेत शाह यांनी सर्व राष्ट्रीय मुद्यांचा उल्लेख केला. यावेळी खासदार डॉ. हिना गावित, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, नवापूर मतदार संघाचे उमेदवार भरत गावित, माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित व भाजपा पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. या सभेला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
हेही वाचा- निवडणुकीच्या तोंडावर भाजप कार्यकर्त्यांमध्ये हमरी-तुमरी