नंदुरबार- देशातील आणि राज्यातील कोरोनाचे संकट लक्षात घेऊन केंद्र सरकारने जेईई व नीट परीक्षा रद्द करावी, या मागणीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी अॅड. के.सी. पाडवी यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधून त्यांना याप्रकरणी लवकरच निर्णय होईल असे सांगितले. यावेळी सोशल डिस्टन्सिंग राखत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या भावना आणि आरोग्य लक्षात घेऊन या परीक्षा पुढे ढकलाव्यात किंवा रद्द कराव्यात, अशी मागणी के. सी. पाडवी यांनी केली.
दरम्यान, राज्यभरात विद्यार्थ्यांकडून जेईई व नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी काल उपरोक्त दोन्ही परीक्षा रद्द करण्यात याव्या, या मागणीसाठी काँग्रेस आणि एनएसयूआयच्यावतीने देशभरात आंदोलन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पुणे शहर काँग्रेसने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गेटवर आंदोलन केले होते.
हेही वाचा- ठाणेपाडा जंगलात मांडूळाची तस्करी; एकाला अटक