ETV Bharat / state

जिल्हाधिकारी बालाजी मंजुळेंचा नवापूर तालुका दौरा, घेतला दुष्काळाचा आढावा - पाहणी

जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी नवापूर तालुक्याला भेट देऊन कामांची पाहणी केली. यावेळी नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या योजनांना जलद गतीने मंजुरी देऊन उपायोजना राबवण्याचे त्यांनी आदेश दिले.

जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे
author img

By

Published : May 28, 2019, 11:36 PM IST

नंदुरबार - जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी प्रत्येक आठवड्यात एका तालुक्याचा आढावा घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार त्यांनी नवापूर तालुक्याला भेट देऊन कामांची पाहणी केली. यावेळी नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या योजनांना जलद गतीने मंजुरी देऊन उपायोजना राबवण्याचे त्यांनी आदेश दिले. तर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काही ठिकाणी त्यांनी जाऊन पाहणीही केली.

जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे

जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांचा हा निर्णय जिल्ह्याच्या विकासकामांना गती मिळण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. मंगळवारी सकाळपासूनच जिल्हाधिकारी मंजुळे हे नवापूर तालुक्यात पोहोचले. तालुक्यातील सुरू असलेल्या कामावर संबंधित अधिकाऱ्यांना पाहणी करण्यासाठी त्यांनी पाठविले. काही ठिकाणी स्वतः जाऊन त्यांनी पाहणी केली. दुपारी साडेतीन वाजता अधिकार्‍यांची आढावा बैठक त्यांनी घेतली. यामध्ये सुरू असलेल्या कामांना पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.

तालुक्यात ज्याठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या भागातील अधिकाऱ्यांना सुविधा पुरवण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या पाहणी दौर्‍यात नवापूर तालुक्यातील सोनपाडा गावात 2016 - 17 दरम्यान 100 केवीचे ट्रांसफार्मर बसवण्याची मंजुरी मिळाली होती. मात्र प्रत्यक्षात काम झालेले नाही, असे आढळून आले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला कामाच्या चौकशीचे अहवाल द्यायला सांगितला आहे. या निर्णयामुळे प्रत्यक्षात सुरू असलेल्या कामांना वेग येईल आणि निर्णय प्रक्रिया जलद होईल, प्रशासनही कामाला लागेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Intro:नंदुरबार जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी प्रत्येक आठवड्यात एका तालुक्यात जाऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी व नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या योजना जलद गतीने मंजुरी देऊन त्या कामांचा पाठपुरावा करून नागरिकांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी आगळावेगळा उपक्रम राबवण्यात येत आहे त्यापैकी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी मंगळवारी नवापूर तालुक्याला भेट देऊन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काही ठिकाणी स्वतः जाऊन पाहणी केली.Body:जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांचा हा निर्णय जिल्ह्याच्या विकास कामांना गती मिळण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे मंगळवारी सकाळपासूनच जिल्हाधिकारी नवापूर तालुक्यात पोहोचले तालुक्यातील सुरू असलेल्या कामाला संबंधित अधिकाऱ्यांना पाहणी करण्यासाठी पाठविले व काही ठिकाणी स्वतः जाऊन पाहणी केली दुपारी साडेतीन वाजता पाहणी अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली यामध्ये सुरू असलेल्या कामांना पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहे.

तालुक्यात ज्याठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या भागातील अधिकाऱ्यांना सुविधा पुरवण्यासाठी निर्देश देण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या पाहणी दौर्‍यात नवापुर तालुक्यातील सोनपाडा गावात 2016 - 17 दरम्यान 100 केवी चे ट्रांसफार्मर बसवण्याची मंजुरी मिळून देखील प्रत्यक्षात काम झालेले नाही असे आढळून आले त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला कामाच्या चौकशीचे अहवाल द्यायला सांगितले.Conclusion:जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे प्रत्यक्षात सुरू असलेल्या कामांना वेग येईल आणि निर्णय प्रक्रिया जलद होईल, प्रशासनही कामाला लागेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

बाईट बालाजी मंजुळे जिल्हाधिकारी नंदुरबार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.