नंदुरबार - तळोदा पंचायत समितीमधील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच स्वीकारताना अटक केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल बांधण्याची रक्कम मिळण्यासाठी लाभार्थ्यांकडून 500 रुपयाची लाच हा लिपिक घेत होता.
हेही वाचा - आठ लाखांच्या अवैध दारूसाठ्यासह मुद्देमाल जप्त; मोलगी पोलिसांची कारवाई
प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल बांधण्यासाठी तक्रारदार लाभार्थ्याची 15 हजार रुपयांची रक्कम मंजूर झाली होती. ती रक्कम बँकेत जमा करण्यासाठी पंचायत समितीचा लिपिक अंकुश फकिरा चित्ते याने 500 रुपयांची मागणी केली. त्यानुसार ती रक्कम स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लिपिक अंकुश यास रंगेहाथ अटक केली.
हेही वाचा - सारंगखेडा चेतक उत्सव लोकसहभागातून होणार साजरा
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शिरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, जयपाल अहिररराव, हवालदार महाजन, गुमाणे, दीपक चित्ते, नावडेकर, ज्योती पाटील, चालक बोरसे यांनी केली.