ETV Bharat / state

Child Death In Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यात तीन महिन्यात दगावले 179 नवजात बालकं, आता सुरू केलं 'लक्ष्य 84 डेज मिशन'

Child Death In Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यात मागील तीन महिन्यात तब्बल 179 बालकांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता 'लक्ष्य 84 डेज मिशन' शासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलं आहे. जुलै महिन्यात 75 बालकं दगावली आहेत. तर ऑगस्टमध्ये 86 बालकांचा मृत्यू झाला आहे. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत 18 बालकांनी विविध कारणानं प्राण सोडला आहे.

Child Death In Nandurbar
संग्रहित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 12:32 PM IST

नंदुरबार Child Death In Nandurbar : आदिवासी बहुल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात 'पानगळ' सुरुच असून तीन महिन्यात तब्बल 179 नवजात बालकं दगावल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. यात जुलै महिन्यात 75 चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे तर ऑगस्टमध्ये 86 बालकांचा बळी गेला आहे. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत 18 बालकं दगावली आहेत. ही जीवितहानी रोखण्यासाठी शासनानं लक्ष्य 84 डेज मिशन सुरु केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक सावन कुमार यांनी दिली आहे.

तीन महिन्यात झाले 179 बालकाचे मृत्यू : नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी पाड्यावरील माता आणि बालमृत्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे शासन बालमृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र तरीही मागील तीन महिन्यात तब्बल 179 बालकांचे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे. यात जुलै महिन्यात 75 बालकांचा मृत्यू झाला आहे. ऑगस्टमध्ये तब्बल 86 बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत 18 बालकं दगावल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.

  • #WATCH | Nandurbar, Maharashtra | 179 children died in the civil hospital in the last three months.

    Nandurbar CMO M Sawan Kumar says, "Looking at the data 75 deaths in July, 86 deaths in August and 18 deaths in September till now happened in Nandurbar district. Major reasons… pic.twitter.com/a0HFiCKnuu

    — ANI (@ANI) September 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तब्बल 70 टक्के बालमृत्यू होतात 0 ते 28 दिवसात : नंदुरबार जिलह्यात झालेल्या बालमृत्यूंची आकडेवारी हादरवून टाकणारी आहे. मात्र यातील 70 टक्के बालमृत्यू हे केवळ 0 ते 28 दिवसात झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली. पालघर जिल्ह्यात एकूणच असणाऱ्या असुविधा आणि मातांना मिळणारं पोषण याचा बालमृत्यूवर मोठा परिणाम करत असल्याचं यातून स्पष्ट होत आहे.

या कारणांनी होत आहेत बालमृत्यू : नंदुरबार हा जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या जिल्ह्यात माता आणि बालकांना रुग्णालयात नेताना मोठी अडचण असते. अनेक माता आणि बालकांचाही मृत्यू वाटेत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी तर रस्ते नसल्यानं झोळी करुन मातेला रुग्णालयात दाखल करावं लागते. त्यामुळे माता आणि बालकांच्या जीवावर बेतलं जाते. नंदुरबारमध्ये झालेले बालमृत्यू हे बालकांचं जन्मजात वजन कमी असणं, जन्मजात आजार असण, आईला सिकलसेल आजारानं ग्रासणं, प्रसूतीवेळी असलेल्या कॉम्प्लिकेशनमुळे मृत्यू होणं, आदी अनेक कारणं असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक सावन कुमार यांनी यावेळी सांगितलं.

मिशन लक्ष्य 84 डेज केलं सुरु : नंदुरबार जिल्ह्यातील माता आणि बालमृत्यूंचं प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा परिषदेनं आता पुढाकार घेतला आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात लक्ष्य 84 डेज मिशन सुरु करण्यात आलं आहे. या मिशन अंतर्गत बालमृत्यू पूर्णपणानं रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती सावन कुमार यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. Child mortality : भारतातील बालमृत्यू दराची सद्यस्थिती काय? जाणुन घ्या!
  2. World Infant Protection Day 2022 : अडीच लाख नवजात बालकांचा होतो पहिल्याच महिन्यात मृत्यू - डब्ल्यूएचओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.