नंदुरबार - जो शासक आपल्या देशातील प्रजेचे ऐकत नाही, तो हुकूमशाहच असतो, अशी घणाघाती टीका भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. आज संविधान जनजागृती रॅलीसाठी नंदुरबारमध्ये होते.
भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद (Bhim Army founder Chandrashekhar Azad) यांनी संविधान जनजागृती रॅलीत मोदी सरकावर कडाडून टीका केली. आझाद म्हणाले, की मागील वर्षभरात शेतकरी आंदोलनादरम्यान साडेसातशेहून अधिक शेतकऱ्यांनी प्राण सोडले. मात्र, मोदी सरकारने मौन बाळगले होते. कायदे मागे घेणे हा लोकशाहीचा अपमान आहे. त्यामुळे मोदींनी राजीनामा ( Chandrashekhar Azad seek resignation from PM Modi) द्यावा. उत्तराखंड, उत्तरप्रदेश आणि पंजाबच्या निवडणुक डोळ्यासमोर ठेवून तीन कायदे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरीदेखील मोदी कधीही पलटतील याचा काहीही भरोसा नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
हेही वाचा-राष्ट्रपती आणि पंतप्रधान वाढणार आता एकाच छताखाली
फालतू लोकांना पुरस्कार दिले जातात-
कंगनासारख्या फालतू लोकांवर मी काय बोलणार. त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला आहे. पुरस्कार द्यायचा तर महात्मा फुले, राजश्री शाहु यांना भारत रत्न द्या, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. राज्यात झालेल्या भीमा कोरगावा दंगली प्रकरणी अटक असलेल्या सर्व बहुजन बांधवांची सुटकेची मागणी यावेळी त्यांनी केली. तर महात्मा ज्योतीबा फुलेंचा स्मृतीदिन सरकारने शिक्षण दिन म्हणून घोषीत करण्याची मागणी त्यांनी केली. संविधान वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरजदेखील त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा-मलिक यांनी ट्विट केलेले 'ते' Whats App चॅट्स बनावट; क्रांती रेडकर यांची पोलिसात ऑनलाइन तक्रार
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कृषी कायदे मागे
भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad slammed Modi gov) म्हणाले, की केंद्रातील भाजप सरकार ही आरएसएस प्रणित सरकार आहे. हे सरकार देशातील संविधान संपविण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांना जागरुक करण्यासाठी ही संविधान यात्रा काढण्यात आली आहे. केंद्रातील भाजप सरकार शेतकरीविरोधी आहे. त्यांनी तीन्ही कायदे जरी मागे घेतले असले तरी त्यांनी आगामी उत्तर प्रदेश, पंजाब व हरियाणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदे मागे घेतले आहेत. मोदी सरकारने कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची माफी मागावी व त्यांना न्याय द्यावा, असेदेखील चंद्रशेखर आझाद यांनी सांगितले.
हेही वाचा-Fuel Price : राज्य सरकारनेही इंधनावरील व्हॅट कमी करावा - नाना पटोले