ETV Bharat / state

नवरीसोबत आलेल्या ब्युटीशियनला कोरोनाची लागण; वधु-वरांसह 29 जण क्वॉरंटाईन - नंदुरबार कोरोना अपडेट

काही दिवसांपूर्वीच भुसावळ येथील एका लग्नातील नवरदेव कोरोना पॉझिटिव्ह आढळला घटना उघडकीस आली होती. त्याच्या संपर्कात ब्युटीशियन आल्याने तिला क्वॉरंटाईन करुन नमुने तपासणीसाठी पाठविले असता 30 जूनला तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सदर महिला विसरवाडीतील लग्न समारंभात उपस्थित राहिल्याने आता वधु-वरांसह 29 जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

नंदुरबार कोरोना अपडेट
नवरीसोबत आलेल्या ब्युटीशियनला कोरोनाची लागण; वधु-वरांसह 29 जण क्वॉरंटाईन
author img

By

Published : Jul 2, 2020, 11:34 AM IST

Updated : Jul 2, 2020, 12:07 PM IST

नंदुरबार - एका लग्न समारंभात नवरीच्या मेकअपसाठी आलेली ब्युटीशियन कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची घटना उघडकीस आली आहे. यानतंर तिच्या संपर्कात आलेल्या वधु-वरांसह 29 जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

चोपडा तालुक्यातील अडावद येथील वधु लग्नासाठी नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे आली होती. यावेळी 20 वर्‍हाडींसह नवरीच्या मेकअपसाठी ब्युटीशियन आली होती. 25 जूनला ती नवरीबरोबर राहिली. मात्र, काही दिवसांपूर्वीच भुसावळ येथील एका लग्नातील नवरदेव कोरोना पॉझिटीव्ह आढळला होता. त्याच्या संपर्कात ही ब्युटीशियन आली होती. यामुळे तिला क्वॉरंटाईन करुन नमुने तपासणीसाठी पाठविले असता 30 जूनला तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

अमरावतीच्या कृष्णानगर परिसरात एकाच कुटुंबातील 7 जणांना कोरोना

यामुळे खबरदारी म्हणून तिच्या संपर्कात आलेल्या विसरवाडीतील विवाह सोहळ्यातील वधु-वरांसह 29 जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. यात वधु-वरांसह 2 जणांना नवापूर येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर उपस्थितांपैकी पुजारी व आचारींसह पंचवीस जणांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले. तर, विसरवाडी ग्रामपंचायतीने खबरदारी घेत विवाह सोहळा झालेल्या परिसरात निर्जंतुकीकरण केल असुन आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण मोहिम सुरु केली आहे.

Last Updated : Jul 2, 2020, 12:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.