नंदुरबार - राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाच्या विरोधात दोन दिवसीय संप पुकारला आहे. शहरातील राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी बँकांच्या समोर जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी केली. खासगीकरणमुळे आर्थिक व्यवहाराची वाट लागले. त्याचबरोबर बँकेतील ग्राहकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल म्हणून हे निदर्शने केली जात असल्याची माहिती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
बँक कर्मचाऱ्यांची राष्ट्रीयीकृत बँकांसमोर जोरदार निदर्शने
अर्थमंत्र्यांनी सरकारी बँकांचे खासगी करण्यात होणार असल्याची घोषणा केली. याला बँक कर्मचारी संघटनांनी जोरदार विरोध दर्शविला आहे. नंदुरबार जिल्ह्यात या संपला मोठ्या संख्येने बँक कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला असल्याची माहिती बँक कर्मचारी संघटनेचे संजय मराठी यांनी दिली आहे.
जिल्हाभर बँक कर्मचाऱ्यांची निदर्शने
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, विसरवाडी, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, अक्राणी यासह राष्ट्रीयकृत बँक असलेल्या शहरांसह ग्रामीण भागात बँका दोन दिवस संपावर असल्यामुळे बँकांसमोर कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली.
बँकेचे खासगीकरण झाल्यास सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान
राष्ट्रीयकृत बँकांचे खासगीकरण झाल्यास बँक ग्राहकांचे व सर्व सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध योजनांचा ला देखील मिळणार नाही व त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकाचे खासगीकरण हे सामान्य नागरिकांसाठी नुकसानकारक असल्याची माहिती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा - नंदूरबार जिल्हा परिषदेचा 26 कोटींचा शिल्लकी अर्थसंकल्प मंजूर
हेही वाचा - कोरोनाचा वाढता प्रार्दुर्भाव; नंदुरबार व शहादा शहर हद्दीतील सर्व शाळा 31 मार्चपर्यंत बंद