नंदुरबार - अण्णासाहेब पाटील महामंडळ कौशल्य विकास विभागातून तक्रारदाराने शासकीय योजनेतंर्गत महिंद्रा पिकअप वाहन खरेदी केली होती. या वाहनावरील व्याज शासन दरमहा तक्रारदाराच्या बँक खात्यात ऑनलाईन जमा करत असते. सदर व्याजाची थकीत दोन महिन्याची रक्कम मंजुर करुन तक्रारदाराच्या खात्यात जमा करावी, यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे जिल्हा समन्वयक योगेश चौधरी यांनी त्याबदल्यात 3 हजार रुपये लाचेची मागणी केली.
हेही वाचा... रडत बसण्यापेक्षा लढणार, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींनी दिली दहावीची परीक्षा...!
या दरम्यान तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने अण्णासाहेब पाटील महामंडळ कार्यालयाच्या आवारात सापळा रचून तक्रारदाराकडून 3 हजार रुपयांची लाच स्वीकारताना योगेश चौधरी यांना रंगेहात केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपधिक्षक शिरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, जयपाल अहिरराव, महाजन गुमाने, चित्ते मराठे ज्योती पाटील आदींनी ही कारवाई केली.