ETV Bharat / state

चांदसेली घाटात दरड कोसळली, आरोग्य केंद्रही बंद... उपचारासाठी जाणाऱ्या महिलेचा पतीच्या खांद्यावरच मृत्यू - नंदुबार महिलेचा मृत्यू

पिपळाकुवा येथील महिला सिदलीबाई पाडवी या आजारी असल्याने त्यांचे पती त्यांना उपचाराठी चांदसेली हून तलोळ्यादाला घेऊन येण्यासाठी निघाले. मात्र दरड कोसळल्याने वाहन जाण्यास रस्ता नव्हता. इकडे पत्नीची तब्येत खालावल्याने पाडवी यांनी पत्नीला खांद्यावरून तळोद्याला न्यायचा निर्णय घेतला. मात्र सिदलीबाई यांनी रस्त्यातच जीव सोडला आणि दुर्दैवाने त्यांच्या पत्नीचा जीव वाचवण्यासाठी पाडवी यांनी केलेल्या धडपडीला अपयश आले.

उपचाराला जाणाऱ्या महिलेचा पतीच्या खांद्यावरच मृत्यू

author img

By

Published : Sep 9, 2021, 10:52 AM IST

Updated : Sep 9, 2021, 11:04 AM IST

नंदुरबार - धडगाव तालुक्यातील चांदसेली घाटात दरड कोसळल्याने एका महिलेला उपचारासाठी नेता आले नाही, त्यामुळे तिचा रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला. सिदलीबाई पाडवी असे त्या मृत महिलेचे नाव आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे सिदलीबाई पाडवी यांना उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी एखाद्या वाहनाची देखील सोय उपलब्ध करता आली नाही. त्यांचे पती त्यांना खांद्यावरून उपचारासाठी घेऊन जात होते. मात्र त्यातही दरड कोसळल्याने उपचाराअभावी त्या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पुन्हा सातपुड्यातील आदिवासींचं दुर्दैव आणि दुःख समोर आलं आहे. या चांदसैली घाटात दरवर्षी दरड कोसळल्यामुळे वाहतूक बंद पडते आणि हजारो आदिवासी बांधवांचा जीवन वेठीस धरले जाते. त्यामुळे लोकसंघर्ष मोर्चा तर्फे प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

चांदसेली घाटात दरड कोसळली, महिलेचा मृत्यू

दरडीखाली नव्हे तर आजाराने महिलेचा मृत्यू- जिल्हा प्रशासनाची माहिती

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे तळोदा-धडगाव रस्त्यावरील चांदसेली घाटात रस्त्यांवर दरड कोसळली होती. त्यामुळे यामार्गावरील वाहतूक पूर्णत:बंद झाली होती. त्याचवेळी पिपळाकुवा येथील महिला सिदलीबाई पाडवी या आजारी असल्याने त्यांचे पती त्यांना उपचाराठी चांदसेली हून तलोळ्यादाला घेऊन येण्यासाठी निघाले. मात्र दरड कोसळल्याने वाहन जाण्यास रस्ता नव्हता. इकडे पत्नीची तब्येत खालावल्याने पाडवी यांनी पत्नीला खांद्यावरून तळोद्याला न्यायचा निर्णय घेतला. मात्र सिदलीबाई यांनी रस्त्यातच जीव सोडला आणि दुर्दैवाने त्यांच्या पत्नीचा जीव वाचवण्यासाठी पाडवी यांनी केलेल्या धडपडीला अपयश आले.

दरड कोसळून नाही आजारी असल्याने मृत्यू-

तळोदा मार्गावर कोसळलेल्या दरडीत रुग्णवाहिका अडकल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची एक बातमी सिदलीबाई पाडवी यांच्या मृत्यूनंतर तालुक्यात पसरली होती. मात्र पिपलाकुवा येथील महिला सिदलीबाई पाडवी यांचा मृत्यू दरडीखाली नव्हे तर त्यांचा्या आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. त्या दरडीखाली सापडल्या नाहीत, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. मात्र दरड कोसळल्यामुळे त्यांना वेळेत रुग्णालयात पोहोचता आले नाही, याला प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

सिदलीबाई यांना तिच्या कुटुंबीयांनी बुधवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयातील अधीपरिचारिकेने रुग्णास तपासले असता, ती महिला शुध्दीवर नव्हती आणि रक्तदाब आणि पल्स जाणवत नव्हते. महिलेचे संपूर्ण शरीर थंड पडून कडक झाले होते. त्यावरून रुग्णालयात येण्यापूर्वीच महिला मृत झाल्याची खात्री अधीपरिचारिकेने केली. तसेच त्याबाबत तिने सिदलीबाई यांचा मृत्यू झाल्याचेही सोबतच्या व्यक्तीला सांगितले. रुग्णास मृत अवस्थेत आणल्याने पोलिसांना कळवुन पुढील कार्यवाही करावी लागेल व त्यासाठी केसपेपर काढावा, अशी सुचना अधिपरिचारिकांनी केली. त्यावर ती व्यक्ती सदर महिलेस मोटरसायकलीवर घेऊन गेली. याबाबत तळोदा पोलीस ठाण्याला देखील कळविले होते, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

उपचाराला जाणाऱ्या महिलेचा पतीच्या खांद्यावरच मृत्यू
उपचाराला जाणाऱ्या महिलेचा पतीच्या खांद्यावरच मृत्यू

चांदसेली येथील सरकारी रुग्णालयाचे उपकेंद्र बंदच-

चांदसैली येथील उपकेंद्र येथे डॉक्टर हजर राहत नाही. येथील आरोग्य उपकेंद्र नेहमी बंद असते. तसेच इथे कुठल्याही मोबाईल कंपनीचे टॉवर नसल्याने रेंज नाही. त्यामुळे अत्यावश्यक परिस्थितीमध्ये आरोग्य विभागाची 108 क्रमांकाची रुग्णावाहिका बोलवण्यासाठी संपर्क देखली साधता आला नाही. तसेच मागील तीन वर्षांपासून चांदसैली घाटाच्या कठड्यांची आणि दरड कोसळण्याची शक्यता असल्याने त्याबाबत खबरदारी घेण्यासंदर्भात लेखी तक्रार आम्ही लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने प्रशासनाकडे केली. मात्र प्रशासनने ग्रामस्थांच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले. परिणामी आज सिदलीबाई यांना उपचाराअभावी जीव गमवावा लागला.

प्रशासकीय यंत्रणेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा-

नंदुरबार जिल्हा हा आकांक्षा योजनेतील जिल्हा असून यासाठी विशेष निधी येतो. तसेच पंतप्रधान सडक योजनेतून झालेली रस्त्याची अनेक काम अतिशय निकृष्ट दर्जाची झाली आहेत. आम्ही याबाबत वारंवार नवसंजवणी बैठकीत तक्रार मांडूनही काहीही फरक पडत नाही. आदिवासी विकासासाठी स्वतंत्र निधी असूनही इथली दैना संपत नाही, ही बाब अत्यंत गंभीर असल्याची खंत लोक संघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तसेच सिदलीबाई यांच्या मृत्यू प्रकरणी प्रशासनाचा निषेधही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या सर्व प्रकरणात आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग हे जबाबदार आहेत. लोक संघर्ष मोर्चा या दोषींवर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करत असल्याची माहिती प्रतिभा शिंदे यांनी दिली.

चांदसेली घाटात दरड कोसळली
चांदसेली घाटात दरड कोसळली

कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी-

चांदसेली घाटातील रस्ता कायमस्वरूपी दुरुस्त करावा असे कोणाला वाटत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तात्पुरती डागडुजी करून रस्ता सुरू केला जातो आणि दुर्घटनांना आमंत्रण दिले जाते. काही दिवसांपूर्वी तोरणमाळ जवळ अशाच पद्धतीने रस्ते खराब असल्यामुळे झालेल्या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. सातपुडा डोंगर रांगा मधील रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आणि अशा होणाऱ्या अपघातात बाबत केंद्रीय मानवधिकार आयोगाने देखील दखल घेतली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला चौकशी अहवाल देण्याबाबत सांगण्यात आले असल्याची माहिती लोकसंघर्ष मोर्चाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे.

रस्ता सुरू करण्यासाठी बांधकाम विभागाची युद्धपातळीवर काम सुरू

तळोदा-चांदसैली घाटात तब्बल शंभर मीटर भागात रस्त्यावर दरड कोसळली. डोंगरावरील दगड व मातींच्या ढिगाऱ्यामुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. याबाबतची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी दाखल होत जेसीबीच्या सहाय्यांनी रस्त्यावर दरड बाजुला करुन वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु केले आहे. चांदसैली घाटात दरड कोसळल्यामुळे तळोद्याकडे येणारी वाहतूक देखील ठप्प झाली होती.

Last Updated : Sep 9, 2021, 11:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.