नंदुरबार -आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आशासेविका आणि गटप्रवर्तक गेल्या आठ दिवसापासून विविध प्रकारचे आंदोलन करीत आहेत. मात्र सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. आठवडाभरापासून वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करूनही दखल घेतली जात नसल्याने आशासेविका आक्रमक झाल्या आहेत.
अचानक आशा सेविका आणि गतप्रवर्तकांनी नंदुरबार पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केल्याने शहरातील नेहरू चौक परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी पंचायत समितीकडे जाणारी वाहतूक वळवून वाहतूक सुरळीत केली. आमच्या मागण्याची दखल घेतली गेली नाही तर तीव्र आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे.