ETV Bharat / state

६० वर्षात प्रथमच महाराष्ट्र-गुजरात सीमेवर लक्ष्मण रेषा, पोलिसांचा फौजफाटा तैनात

नवापूर तालुक्यातील जवळपास ४० गावांची सीमा गुजरात राज्य सीमेला लागून आहे. महाराष्ट्र राज्याने संपूर्ण गावांची सीमा खबरदारी म्हणून सील केली आहे. सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

maharashtra-gujrat border seal
सीमेवर तैनात असलेले पोलीस कर्मचारी
author img

By

Published : May 2, 2020, 10:50 AM IST

Updated : May 2, 2020, 8:04 PM IST

नंदुरबार- महाराष्ट्र-गुजरात या दोन्ही राज्यांची मुंबई प्रांतमधून १ मे १९६० साली निर्मिती झाली होती. दरवर्षी १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. परंतु, जगात कोरोना विषाणूच्या महामारीने संपूर्ण देश ठप्प झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दोन्ही राज्यातील सीमावरती गावांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाकडून लक्ष्मण रेषा आखण्यात आली आहे.

माहिती देताना पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे आणि शिक्षक निलेश पाटील

जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील जवळपास ४० गावांची सीमा गुजरात राज्य सीमेला लागून आहे. महाराष्ट्र राज्याने संपूर्ण गावांची सीमा खबरदारी म्हणून सील केली आहे. सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नागरिक गुजरातमध्ये जावू शकत नाही, गुजरात राज्यातील नागरिक महाराष्ट्रात जावू शकत नाही, असा कडक पोलीस बंदोबस्त सदर दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात करण्यात आला आहे.

हेही वाचा- जिल्हाधिकारी कार्यालयात खबरदारी म्हणून येणाऱ्या प्रत्येकाची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी

Last Updated : May 2, 2020, 8:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.