ETV Bharat / state

गुजरात-महाराष्ट्र सीमेजवळ भीषण अपघात; 9 ठार 24 जखमी..

author img

By

Published : Mar 2, 2020, 10:21 PM IST

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोनगढ डेपोची एसटी बस (क्र. जीजे १८ झेड ६४६८) ही कुशलगढहून उकाई गावाकडे जात होती. यावेळी पोखरण गावाजवळ, अचानक तिने समोरून येणाऱ्या टँकरला (क्र. जीजे ०२ एक्सएक्स ६५८८) धडक दिली. यादरम्यान, दुसरी एक जीप (क्र. एमएच ४१ एएच ५३०९) या दोन्ही वाहनांना येऊन धडकली. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.

Gujrat Accident
गुजरात-महाराष्ट्र सीमेजवळ भीषण अपघात; 9 ठार 24 जखमी..

नंदुरबार - महाराष्ट्र-गुजरात सीमेवर झालेल्या तिहेरी अपघातात नऊ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, तर २४हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. गुजरातच्या तापी जिल्ह्यातील पोखरण गावाजवळ एस.टी. बस, टँकर आणि जीपमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताची भीषणता एवढी होती, की जीपचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोनगढ डेपोची एसटी बस (क्र. जीजे १८ झेड ६४६८) ही कुशलगढहून उकाई गावाकडे जात होती. यावेळी पोखरण गावाजवळ, अचानक तिने समोरून येणाऱ्या टँकरला (क्र. जीजे ०२ एक्सएक्स ६५८८) धडक दिली. यादरम्यान, दुसरी एक जीप (क्र. एमएच ४१ एएच ५३०९) या दोन्ही वाहनांना येऊन धडकली. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.

या अपघातामध्ये तिन्ही वाहनांच्या चालकांसह एकूण नऊ लोकांचा जीव गेल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, २४ जण जखमी आहेत. अपघाताची भीषणता पाहता हा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा : 'तो' खून एकतर्फी प्रेमातून; आरोपीला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.