ETV Bharat / state

जि. प. पोटनिवडणुकीत 68.98 टक्के मतदान; सर्वच पक्षांनी केला विजयाचा दावा - पोटनिवडणूक अपडेट न्यूज

किरकोळ वाद वगळता ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. यावेळी सर्वच पक्षांनी विजयी होण्याचा दावा केला. परंतू दावे प्रतिदावे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

नंदुरबार पोटनिवडणूक
नंदुरबार पोटनिवडणूक
author img

By

Published : Oct 5, 2021, 9:05 PM IST

Updated : Oct 5, 2021, 9:18 PM IST

नंदुरबार - जिल्हा परिषदेच्या ११ गट व १३ गणांच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदारांमध्ये चांगला उत्साह दिसून आला. सकाळच्या सत्रात मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती तर सायंकाळी काही प्रमाणात निरुत्साह दिसून आला. साडेपाच वाजेपर्यंत 65.98 टक्के मतदान झाले. किरकोळ वाद वगळता निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. यावेळी सर्वच पक्षांनी विजयी होण्याचा दावा केला. परंतू दावे प्रतिदावे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अति संवेदनशील मतदान केंद्रांवर राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यादेखील तैनात करण्यात आल्या होत्या.

11 गट व 14 गणांसाठी पोटनिवडणूक

जिल्हा परिषदेच्या ५६ गट आणि ११२ गणांसाठी डिसेंबर २०१९मध्ये निवडणूक झाली होती. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपाने प्रत्येकी २३ तर शिवसेनेने ७ व राष्ट्रवादीने ३ जागांवर विजय मिळविला होता. सत्तेसाठी २९ जागांची आवश्यकता होती. म्हणून शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा देत सत्ता स्थापन केली होती. मात्र, आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषदेच्या ओबीसी प्रवर्गातील ११ उमेदवारांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेण्याचे आदेश दिल्याने ११ गट व १४ गणांसाठी जुलै महिन्यात पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. आता पुन्हा हा निवडणूक कार्यक्रम उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेपासून सुरू करण्यात आला. त्यामुळे आज मतदान प्रक्रिया पार पडली. या पोटनिवडणुकीच्या ११ जागांमध्ये नंदुरबार तालुक्यातील ५, शहादा तालुक्यातील ४ तर अक्कलकुवा तालुक्यातील २ जागांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 65.98 टक्के मतदान

सकाळी ७.३० ते ९.३० दरम्यान सरासरी १०.७८ टक्के मतदान झाले होते. यात नंदुरबार तालुक्यात १०.७१, शहादा तालुक्यात १०.८२ टक्के, अक्कलकुवा तालुक्यात ११.०१ टक्के मतदान झाले. सकाळी ११.३० वाजेपर्यंत सरासरी २५.५९ टक्के मतदान झाले. दुपारी दीड वाजेपर्यंत ४२.५५ टक्के मतदान झाले. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५४.३० टक्के मतदान झाले. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी ६५.९८ टक्के मतदान झाले. यात जि. प./पं. स. पोटनिवडणूक

एकूण मतदार - 2, 82, 387 यापैकी अंदाजित

  • स्त्री मतदान - 90, 711
  • पुरुष मतदान - 95, 611
  • एकूण मतदान - 1, 86, 322
  • टक्केवारी - 65.98% एवढ्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजविला आहे.

भवितव्य मतपेटीत बंद

या पोटनिवडणुकीत जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या परिवारातील सदस्यांची भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे. यात काँग्रेसतर्फे पालकमंत्री के. सी. पाडवी यांच्या भगिनी गीता पाडवी, आमदार विजयकुमार गावित यांची लहान कन्या तथा खासदार डॉक्टर हिना गावित यांची लहान बघिनी सुप्रिया गावित तर माजी आमदार तथा शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांचे सुपुत्र राम रघुवंशी अशा जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांचे परिवारातील सदस्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

'महाविकास आघाडीची सत्ता राहील'

नंदुरबार जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या समन्वयाअभावी काही ठिकाणी उमेदवार समोरासमोर आले आहेत. तर काही ठिकाणी आघाडी झाली. परंतु जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता राहील, असा दावा शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे.

'सर्व जागांवर विजयी होणार'

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 11 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपाच्या खासदार डॉ. हिना गावित यांनी संवाद साधताना सांगितले, की जिल्हा परिषदेच्या अकराच्या अकरा जागी भाजपा विजयी होईल. तर पंचायत समितीतील सर्व सदस्यदेखील विजय होतील.

चोख पोलीस बंदोबस्त

जिल्हाधिकारी मनिषा खत्री, सहायक जिल्हाधिकारी मिनल करनवाल, मैनक घोष, शहाद्याचे प्रांताधिकारी डॉ. गिरासे आदींनी मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कुठलाही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

Last Updated : Oct 5, 2021, 9:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.