ETV Bharat / state

नंदुरबार जिल्ह्यात 46 केंद्रांवर 55 हजार नागरिकांनी घेतली लस - Nandurbar latest news

लसीकरण केंद्रांवर फ्रन्टलाइन वर्कर्ससह 65 वर्षांवरील वयोवृद्ध नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे एक एप्रिलपासून 45 वर्षांच्या वरील सर्वसामान्य नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिली आहे.

नंदुरबार लसीकरण
नंदुरबार लसीकरण
author img

By

Published : Apr 2, 2021, 5:41 PM IST

Updated : Apr 2, 2021, 5:48 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात 46 ठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहेत. या लसीकरण केंद्रांवर फ्रन्टलाइन वर्कर्ससह 65 वर्षांवरील वयोवृद्ध नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे एक एप्रिलपासून 45 वर्षांच्या वरील सर्वसामान्य नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिली आहे.

जिल्ह्यात 46 लसीकरण केंद्रांची निर्मिती

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा 16, नवापूर 10, नंदुरबार 12, तळोदा 4, अक्कलकुवा 2, धडगाव 2, अशी एकूण 46 लसीकरण केंद्र उपलब्ध करण्यात आली आहे. यात सरकारी व खासगी लसीकरण केंद्रांचा समावेश आहे. जिल्ह्यात शहादा व नंदुरबार येथे खासगी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

35 हजार डोस शिल्लक

जिल्ह्यात 35 हजार डोस शिल्लक असून आतापर्यंत पहिला व दुसरा डोस मिळून एकूण 54871 फ्रन्टलाइन वर्कर्स व ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाची सुविधा देण्यात आली आहे. 45पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना शासकीय लसीकरण केंद्रावर मोफत तर खासगी लसीकरण केंद्रावर 250 रुपयात लस उपलब्ध करून देण्यात आली आहे, तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

लसीकरणाची आकडेवारी

जिल्हाभरात 22809 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंन्टलाईन वर्कर्स असून यातील 22046 जणांना पहिला डोस तर 10916 दुसरा डोस देण्यात आला आहे. तर 45-60मधील मोर्बिटेडांची संख्या ही 56752 असीन यातील 5238 जणांना पहिला डोस दिल्या गेला आहे. तर 60 वर्षावरील नागरीकांची संख्या ही 189173 असून यातील 11251 जणांना पहिला डोस देण्यात आलेला आहे. एकंदरीत पाहता जिल्ह्यात एकूण 43955 जणांना पहिला डोस तर 10916 जणांना दुसरा डोस असे एकत्रित 54871 लसीचे डोस देण्यात आले आहे.

Last Updated : Apr 2, 2021, 5:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.