ETV Bharat / state

पुणे जिल्ह्यात गेलेल्या नंदुरबार येथील ४८० मजुरांची घरवापसी - workers reach nandurbar

मजुरांना घराकडे येण्याची ओढ लागली होती. ही बाब लक्षात घेऊन राज्यभरात आडकलेल्या आदिवासी मजुरांची माहिती गोळा करून त्या मजुरांना त्यांच्या गावांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था आदिवासी विकास विभागाने सुरू केली आहे. त्यामुळे, बाहेर आडकलेल्या मजुरांनी समाधान व्यक्त केले आहे.

workers reach nandurbar
मजूर
author img

By

Published : May 6, 2020, 10:24 AM IST

नंदुरबार- आदिवासी विकास विभागच्या प्रयत्नामुळे शहर वगळता पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मजुरीसाठी गेलेल्या ४८० मजुरांना १८ बसेसद्वारे पुण्याहून नंदुरबारला आणण्यात आले आहे. या मजुरांना नंदुरबार येथून त्यांच्या गावा पर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली.

माहिती देताना कामगार

रोजगाराच्या शोधात नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाले आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे हे मजूर आडकून पडले होते. कामधंदे बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. त्यांना घराकडे येण्याची ओढ लागली होती. ही बाब लक्षात घेऊन राज्यभरात आडकलेल्या आदिवासी मजुरांची माहिती गोळा करून त्या मजुरांना त्यांच्या गावांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था आदिवासी विकास विभागाने सुरू केली आहे. त्यामुळे, बाहेर आडकलेल्या मजुरांनी समाधान व्यक्त केले आहे.

राज्यभर अडकलेल्या आदिवासी मजूर आणि विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. विविध भागात रोजगार आणि शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची यादी आदिवासी विकास विभागाने तयार केलेली आहे. राज्यातील सर्वच आदिवासी विकास प्रकल्पांना यासाठी न्युकलेस बजेटमधून निधी खर्च करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांनी दिली आहे.

राज्याच्या विविध भागात आणि परराज्यात अडकलेल्या आदिवासी मजुरांनी आणि विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास विभागामार्फत देण्यात आलेल्या वेबसाईटवर किंवा संबंधित जिल्ह्यातील आदिवासी लोकप्रतिनिधींना संपर्क साधावा, असे आवाहन आदिवासी विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.

हेही वाचा- नंदुरबार : पळाशी केंद्रात शिल्लक कापूस खरेदीला सुरुवात..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.