नंदुबार - नवापूर शहरात पोलीस रात्रीची गस्त घालत असताना त्यांना चार तरुण संशयितरित्या आढळून आले. त्यांची चौकशी केली असता त्यापैकी तिघांनी शहरात मोटरसायकल चोरीसाठी आलो असल्याची कबुली पोलिसांना दिली. तर एक जण संशयित असल्याने त्याची चौकशी पोलीस करत आहेत.
हेमंत सोनवणे, रवींद्र पवार, संदीप चौरे हे तिघे महाविद्यालयीन तरुण असून महागड्या गाड्या फिरवण्याची हौस असल्याने त्यांनी मोटरसायकल चोरीला सुरवात केली. त्यांनी आत्तापर्यंत नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातून चोऱ्या केल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी त्यांच्या कडून ५ लाख किंमतीच्या ८ मोटरसायकल हस्तगत केल्या आहेत. या आरोपींकडून अजून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.