ETV Bharat / state

Dragon Fruit Farming : नंदुरबारमधील शेतकऱ्याने केली ड्रॅगन फ्रूटची शेती, मिळवले तब्बल १५ लाखांचे उत्पन्न - नंदुरबारमधील शेतकऱ्याने केली ड्रॅगन फ्रूटची शेती

वातावरणात होणाऱ्या बदलामुळे पारंपारिक शेती पुरवडत नसल्याने शेतकरी आता वेगवेगळे प्रयोग करीत असतात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील शेतकरी राजेश पाटील ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीचा (Dragon Fruit Farming ) यशस्वी प्रयोग केला. त्यांनी पाच एकर क्षेत्रात आठ हजार ड्रॅगन फ्रुटच्या रोपांच्या लागवडीतून ८० ते ९० क्विंंटल उत्पादनातून १५ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.

Dragon Fruit Farming
ड्रॅगन फ्रूटची शेती
author img

By

Published : Nov 15, 2022, 7:56 PM IST

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात पारंपारिक शेतीत मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. यात प्रामुख्याने मिरची, गहू, मका, सोयाबीन व कापूस यासारखे शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेत असतात व यातून आपला उदरनिर्वाह करत असतात. मात्र नंदुरबार जिल्ह्यातील दोघे शेतकऱ्यांनी आता ड्रॅगन फ्रुटची शेती ( Dragon Fruit Farming ) करून पारंपारिक शेती व्यवसायाला फाटा दिला आहे. या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा देखील झाला आहे. वातावरणात होणाऱ्या बदलामुळे पारंपारिक शेती पुरवडत नसल्याने शेतकरी आता वेगवेगळे प्रयोग करीत असतात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील शेतकरी राजेश पाटील ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीचा यशस्वी प्रयोग केला.

नंदुरबार येथील शेतकरी राजेश पाटील माहिती देताना

शेतकऱ्यांसमोर नवीन पर्याय - शहादा येथील शेतकरी राजेश पाटील यांच्याकडे २० एकर जमीन असून ते पारंपरिक शेती करतात. मात्र नैसर्गिक आपत्तीचामुळे त्यांचे मोठ नुकसान झाले. पारंपरिक शेती करत असतांना त्यांनी आपल्या पाच एकर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रूटचा प्रयोग केला आहे. गेल्या वर्षी त्यांनी गुजरातवरून ड्रॅगन फ्रूटचे रोप आणले.

ड्रॅगन फ्रुटची अशा पद्धतीने केली लागवड - आपल्या पाच एकर क्षेत्रात या रोपांची बाग लावली. एकुण आठ हजार रोपे त्यांनी लावली आहेत. ही रोपे आठ बाय बारा फूट या प्रमाणात त्यांनी लागवड केली. एकाच ठिकाणी चार रोपे लावून त्या ठिकाणी सहा फूट सिमेंटचा खांब उभा केला. या खांबाला वरती गोल रिंग लावून त्याला छत्रीचा आकार दिला. दोन वर्षात ही रोपे साधारणत: पाच ते सहा फूट उंचीर्पयत वाढली असून आता त्यांच्या बागेतील रोपे दोन वर्षाची झाली आहेत. त्यांना आता उत्पादन सुरू झाले आहे. आतापर्यंत ८० ते ९० क्विंंटल उत्पादन निघाले असून १५ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. बाहेरील व्यापारी येऊन जागेवर १५० रुपये किलोने खरेदी करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

कमी पाण्यात होणारी फायदेशीर शेती - या पिकाचे उत्पादन डिसेंबर्पयत सुरू राहणार असून.ड्रॅगन फ्रूट या फळझाडाला 25 वर्षांपर्यंत उत्पादन येते. दरवर्षी साधारणत: जून ते डिसेंबर या काळात त्याला फळधारणा होते. निवडूंगाच्या झाडाप्रमाणेच हे काटेरी झाड आहे. वर्षभरानंतर त्याला फळधारणा सुरू होते. पहिल्या वर्षी कमी फळधारणा होते. पण दुस:या वर्षापासून मात्र त्याचे उत्पादन दोन ते चार पटीने वाढते.सातपुड्याच्या डोंगराळ भागात आदिवासी शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत, या शेतीकडे वळावे यात चांगले उत्पादन मिळते आणि बाजार पेठ आसल्याने शेतकऱ्यांनी बाजार पेठेचा विचार करून शेती करावी, असे आव्हान त्यांनी केले आहे. शेतीतील समस्या आणि नैसर्गिक आपत्तीचे यांचे भांडवल न करता पाटील यांनी प्रयोगशील प्रयत्न करीत आदिवासी भागात ड्रॅगन फ्रूटचा शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.