ETV Bharat / state

तरुण शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या, पगार होत नसल्याने पाऊल उचलल्याचे सुसाईड नोटमधून स्पष्ट - अर्धापूर नांदेड

तणावाखाली असलेल्या चंद्रशेखर पांचाळ यांनी आपली राहत्या घरी गळफास घेवून आपले जीवन संपवले आहे. या तरुण शिक्षकाच्या आत्महत्येमुळे राज्यातील खासगी शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आत्महत्या केलेला तरुण शिक्षक चंद्रशेखर नागनाथ पांचाळ
author img

By

Published : Feb 27, 2019, 1:51 PM IST

नांदेड - जिल्ह्यातील अर्धापूर शहरातील एक तरुण शिक्षकाने पगाराची शास्वती नसल्यामुळे आपल्या राहत्या घरातच गळफास घेवून आत्महत्या केली आहे. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. याच बरोबर संस्था चालकाला दिलेले पैसा परत घेण्याचेही त्याने चिठ्ठीत लिहिले आहे.

चंद्रशेखर नागनाथ पांचाळ, असे मृत शिक्षकाचे नाव आहे. त्यांचे शिक्षण एम. ए. बीएडपर्यंत झाले असून ते नांदेडमधील फुलेनगरात राहत होते. गेल्या ४ वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्यांना एक चिमुकली मुलगीही आहे. आज ना उद्या पगार होईल, आपल्या संसारास चांगले दिवस येतील. या आशेवर गेल्या ५ ते ६ वर्षांपासून चिंचगव्हाण येथील एका खासगी शाळेत शिक्षणाचे काम करीत होते, तर त्यांची पत्नी स्पर्धा परिक्षेची तयारी करीत आहे.

खासगी शाळेतील शिक्षकांना विना पगार काम करावे लागते. नोकरीसाठी संस्थाचालकाला देणगीही द्यावी लागते. शाळेला आनुदान मिळेल, पगार होईल, या आशेवर शिक्षक आपले अध्यापनाचे काम करतात. असेच काम चंद्रशेखर पांचाळ करीत होते. मात्र, पगार होणार नाही याची काहीच शाश्वती नाही. या तणावाखाली असलेल्या चंद्रशेखर पांचाळ यांनी आपली राहत्या घरी गळफास घेवून आपले जीवन संपवले आहे. या तरुण शिक्षकाच्या आत्महत्येमुळे राज्यातील खासगी शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

undefined

सुसाईड नोट

काय लिहिले चिठ्ठीत?
मृत चंद्रशेखर पांचाळ यांनी ह्रदय स्पर्शी चिठ्ठी लिहिली आहे. यामध्ये त्याने लिहले आहे की, आण्णा मला माफ करा, मी सोडून चाललो. माझ्याने आता जगणे होत नाही. शाळेत मन लागत नाही. एवढा पैसा देऊन किती दिवस फुकट काम करायचे? पगार कधी चालू होईल? याचीसुध्दा खात्री राहिली नाही. इतके दिवस वाटत होते की, पगार आज होईल उद्या होईल. पिल्लूची काळजी घ्या. मला माहित आहे, तुम्ही तिला चांगल्या प्रकारे सांभाळणार. भाग्यश्री, आई, सोनू, पिंटू सर्वजण मला माफ करा. मी तुमच्यासोबत होतो त्या प्रत्येक क्षणाची आठवण मला आत्ता होते. पण मला जावे लागतेय तुम्हाला सोडून. मला माहित आहे, तुम्हाला मोठा धक्का बसेल. पण यातून तुम्ही बाहेर पडाल. भाग्यश्री तुला जज व्हायचे आहे. किमान माझ्यासाठी तू करशीलच. पिल्लुची काळजी घे. पप्पा कामाला गेलेत म्हणून सांग. तिला रडू देऊ नकोस. आण्णा, आई आणि स्वतःची काळजी घ्या. माझ्यासाठी दिलेले पैसे व्यवहारेकडून घ्या. पिल्लूसाठी कामाला येतील.

Intro:अर्धापूरात तरूण शिक्षकाची गळफास घेवून आत्महत्याBody:अर्धापूरात तरूण शिक्षकाची गळफास घेवून आत्महत्या

जिल्ह्यातील: आज न उद्या पगार होईल , संसार सुखाचा होईल या आशेवर जगणारे राज्यात हजारो शिक्षक खासगी शाळेत शिक्षणाचे काम करित आहेत.पण गेल्या आनेक वार्षापासून खासगी शाळेत कार्यरत आसलेल्या शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न प्रलंबीत आहे. पगाराची वाट पाहणा-या शिक्षकांची व्यथा व दशा खुप गंभीर आहे. अर्धापूर शहरातील ( जिल्हा नांदेड) एक तरुण शिक्षकाने पगार होती की नाही याची शास्वती नसल्यामुळे आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी झाली आहे. आपण पगार होणार नाही. याची शाश्वस्ती नसल्यामुळे आत्महत्या करत आहे. संस्था चालकाला दिलेला पैसा परत घ्या. असे चिठ्ठीत लिहले आहे.
या तरुण शिक्षकाच्या आत्महत्यामुळे राज्यातील खासगी शिक्षकांच्या पगारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शहरातील फुलेनगरात राहणारे चंद्रशेखर नागनाथ पांचाळ हे एम .ए .बीएड झाले आहे. तरूण शिक्षक असून त्यांचे सुमारे चार वर्षेपुर्वी लग्न झाले. त्यांना एक चिमुकली मुलगी पण आहे. आज ना उद्या पगार होईल, आपल्या संसारात चांगले दिवस येतील. या आशेवर गेल्या पाच ते सहा वर्षापासून चिंचगव्हाण (ता .हदगाव जि.नांदेड) येथील एका खासगी शाळेत शिक्षणाचे काम करीत होते. तर त्यांची पत्नी स्पर्धा परिक्षेची तयारी करीत आहे.
खासगी शाळेतील शिक्षकांना विना पगारीवर काम करावे लागते. नोकरीसाठी संस्थाचालकाला देणगीही द्यावी लागते. शाळेला आनुदान मिळेल, पगार होईल. या आशेवर शिक्षक आपले अध्यापनाचे काम करतात. असेच काम चंद्रशेखर पांचाळ हे करीत होते. पण आपली पगार होणार नाही याची काहीच शाश्वती नाही. या तणावाखाली असलेल्या चंद्रशेखर पांचाळ यांनी आपली राहत्या घरी गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली आहे.

चिठ्ठी लिहून संपविले जीवन....!

भाग्यश्री तुला जज व्हायच... पिल्लूची काळजी घे... पप्पा कामाला गेले म्हणून सांग. मयत चंद्रशेखर पांचाळ यांचे सुशिक्षित कुटुंब आहे.त्यांचे वडील नागनाथ पांचाळ हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत .त्यांची पत्नी भाग्यश्री ह्या पदवीधर आहेत. तर त्यांना पिल्लू नावाची चिमुकली मुलगी आहे. ते आपल्या वडिलांना आण्णा म्हणत आसत. मयत चंद्रशेखर पांचाळ यांनी ह्रदय स्पर्शी चिठ्ठी लिहिली आहे. यात त्याने लिहले आहे की, आण्णा मला माफ करा, मी सोडून चाललो. माझ्याने आता जगणे होत नाही, शाळेत मण ही लागत नाही, एवढा पैसा देऊन किती दिवस फुकट काम करायचे. पगार कधी चालू होईल याची सुध्दा गॅरंटी राहिली नाही. इतके दिवस वाटत होते आज होईल उद्या होईल.असे वाटत होते. पिल्लूची काळजी घ्या.मला माहित आहे तुम्ही तीला चांगल्या प्रकारे सांभाळणार. भाग्यश्री, आई, सोनू, पिंटू सर्वजन मला माफ करा. मी तुमच्या सोबत होतो त्या प्रत्येक क्षणाची आठवण मला आत्ता होतेय. पण मला जावं लागतय तुम्हाला सोडून, मला माहित आहे हा तुमच्यासाठी मोठा धक्का बसेल. पण यातून तुम्ही बाहेर पडला.भाग्यश्री तुला जज व्हायचे आहे, किमान तु माझ्यासाठी तु करशीलच, पिल्लु ची काळजी घे, पप्पा कामाला गेलेत म्हणून सांग, तीला रडू देऊ नकोस .स्वरांची काळजी घ्या .आण्णा, आई ची घे आणि स्वताची घे .माझ्यासाठी दिलेले पैसे व्यवहारेकडून घ्या. पिल्लूसाठी कामाला येतील..

तुमचाच चंद्रशेखर..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.