ETV Bharat / state

नांदेडमध्ये तरुणांनी जपली सामाजिक बांधिलकी; गरीबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप - youth distribute ration nanded

सामाजिक बांधिलकी जपत पुण्यजागर प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक लक्ष्मीकांत मुळे, गजानन मेटकर, गुणवंत विरकर आदींनी जुन्या अर्धापूर शहरातील वाडीकर गल्ली, रामनगर, गवळी गल्ली, ब्राह्मण गल्ली, केशवराज नगर आदी भागात जाऊन धान्य जमा केले. आणि जुन्या अर्धापूर शहरातील सुमारे ५५ गरीब कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

corona nanded
गरीब कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करताना तरुण
author img

By

Published : Mar 29, 2020, 3:11 PM IST

नांदेड- देशात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, यामुळे रोजंदारीने काम करणारे तसेच पोटासाठी भटकंती करून उदनिर्वाह करणाऱ्यांवर उपसामारीचे दिवस आले आहे. त्यामुळे, अशा लोकांना काल जुन्या अर्धापूर शहरातील तरुणांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. त्यामुळे, घरोघरी जाऊन अन्न मागून पोटाची खळगी भरणाऱ्यांना थोडासा दिलास मिळाला आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

अर्धापूर शहरातील अर्धापूर-नांदेड मार्गाच्या बाजूला मोकळ्या जागेत मराठवाड्यासह विदर्भ आदी भागातील अनेक गरीब कुटुंबीय वास्तव्यास आहे. यात मुर्तीकार, फोटो, काचेचे मंदिर विकणारे, भिक्षा मागणारे यांचा समावेश आहे. पोटासाठी मिळेल ते काम करून भटकंती करून घरोघरी अन्य धान्य मागून हे कुटुंबीय आपला उदनिर्वाह करतात. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यातील सर्व जिल्ह्यात संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे, या गरीब कुटुंबीयांना खायचे हाल झाले आहेत. कुठेच काही मिळत नसल्याने ही कुटुंबीय उपासमारीच्या उंबरठ्यावर होती.

मात्र, अशावेळी सामाजिक बांधिलकी जपत पुण्यजागर प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक लक्ष्मीकांत मुळे, गजानन मेटकर, गुणवंत विरकर, नाना डक, शिवराज भुसारे यांनी जुन्या अर्धापूर शहरातील वाडीकर गल्ली, रामनगर, गवळी गल्ली, ब्राह्मण गल्ली, केशवराज नगर आदी भागात जाऊन धान्य जमा केले आणि जुन्या अर्धापूर शहरातील सुमारे ५५ गरीब कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या मदतीमुळे गरीब कुटुंबीयांना खूप मोठा आधार मिळाला आहे. या उपक्रमावेळी पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, आरोग्य अधिकारी मदन डाके, सुहास गायकवाड, रामलींग महाजन आदी उपस्थित होते. मदत फेरीत सुरेश डक, आकाश गव्हाणे, शिवाजी पवार, बलवीर देशमुख, आदींनी सहभाग नोंदविला.

हेही वाचा- #लॉकाडऊन : डायलेसीस रुग्णाचा बैलगाडीतून ऐंशी किलोमीटरचा प्रवास...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.