ETV Bharat / state

पोहायला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू; अर्धापूर तालुक्यातील घटना - ardhapur nanded

एका विहिरीवर पोहण्यासाठी काही युवक गेले होते. यावेळी सचिन शिवाजी भोजगंडे (वय-२७) या युवकाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो विहिरीच्या पाण्यामध्ये बुडाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

author img

By

Published : Apr 28, 2020, 11:34 AM IST

नांदेड - विहिरीवर मित्रासोबत पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे 27 एप्रिलला दुपारी घडली. मालेगाव (ता.अर्धापूर) पासून काही अंतरावर असलेल्या एका विहिरीवर पोहण्यासाठी काही युवक गेले होते. यावेळी सचिन शिवाजी भोजगंडे (वय-२७) या युवकाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो विहिरीच्या पाण्यामध्ये बुडाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

सदरील विहिरीची खोली जास्त असल्याने मृतदेह काढण्यासाठी नांदेड येथील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले होते. या पथकाने मृतदेह बाहेर काढला. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे मंडळाधिकारी प्रफुल्ल खंडागळे, तलाठी एन के पाटील यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.