ETV Bharat / state

तार कुंपणात विद्यूत प्रवाह सोडल्याने तरुणाचा मृत्यू, शेतमालकावर दोन महिन्यानंतर गुन्हा दाखल - नांदेड क्राईम

वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने लावलेल्या तार कुंपणात विद्यूत प्रवाह सोडल्यामुळे २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. . या प्रकरणी सोनखेड पोलिस ठाण्यामध्ये शेतमालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा झाला आहे.

Young man dies after touching wire fence
न्यप्राण्यांसाठी लावले तारेचे कुंपण
author img

By

Published : Oct 19, 2021, 4:34 PM IST

नांदेड - वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने लावलेल्या तार कुंपणात विद्यूत प्रवाह सोडल्यामुळे २५ वर्षीय तरुणाचा ८ जुलै रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणी सोनखेड पोलिस ठाण्यामध्ये ऑक्टोबरमध्ये शेतमालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा झाला आहे. तब्बल दोन महिन्यानंतर शेतमालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

लोहा तालुक्यातील सोनबर्डी माळ येथील गणेश बावणे या शेतकऱ्याने ऊसाच्या पिकाचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण व्हावे, यासाठी शेताच्या चहुबाजूंनी तारेचे कुंपन लावले होते. बावणे याने बेकायदेशीर रित्या विद्युत प्रवाहाच्या तारेवर आकोडे टाकून कुंपनाच्या तारेत विद्युत प्रवाह सोडला होता. विद्यूत प्रवाह सोडलेल्या या तारेला स्पर्ष होऊन अंकुश नरवाडे (२५) याचा ८ जुलै रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणी सोनखेड पोलिस ठाण्यामध्ये शेतमालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा झाला आहे.

शेतमालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल...!

वडेपूरी येथील अंकुश नरवाडे हा २५ वर्षीय तरुण आपल्या मित्रासोबत सोनबर्डी माळाजवळ गेला असतांना शेतातील कुंपनाला त्याचा स्पर्ष झाला. यावेळी विद्युत शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शेतमालकाला अनाधिकृतपणे आकोडे टाकुन, विद्युत प्रवाह सोडल्यास एखाद्याचा मृत्यू होवून शकतो, ही बाब माहिती असतांना सुध्दा तारेमध्ये विद्युत प्रवाह सोडला. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.