ETV Bharat / state

invalidated caste certificate : उच्च शिक्षणासाठी हिंदुत्वाचा अडथळा; महादेव कोळी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा

author img

By

Published : Jan 4, 2023, 11:53 AM IST

Updated : Jan 4, 2023, 1:17 PM IST

महादेवाची पूजा केल्याने जात प्रमाणपत्र अवैध ठरविल्याचा प्रकार नांदेडमध्ये समोर ( Worshiping Mahadev invalidated caste certificate ) आला. त्यामुळे देवांच्या मूर्तीसह जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा ( procession at collector office with God idols ) काढण्यात येणार आहे.

invalidated caste certificate
अवैध जात प्रमाणपत्र
जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा

नांदेड : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून हिंदुत्वावरून चांगलेच रणकन्दन सुरु आहे. परंतू हेच हिंदुत्व एका आदिवासी समाजातील डॉक्टर युवतीच्या उच्च शिक्षणात अडसर ठरले ( Difficulty in Higher education in tribal society ) आहे. जात पडताळणी समितीने जात प्रमाणपत्र अवैध ठरवताना इतर कारणासोबत हिंदुत्वाचा मुद्दाही अधोरेखित केल्याने महादेव कोळी समाजात तीव्र असंतोष आहे. या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी महादेव कोळी समाजाच्यावतीने दि. ५ रोजी देवादिकांच्या मूर्तीसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले (Mahadev Koli Samaj procession at Collector office ) आहे.

जात प्रमाणपत्रात अडचणी : हदगाव तालुक्यातील खरटवाडी येथील मयुरी श्रीकृष्ण दसरु पुंजरवाड या युवतीने आपले एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. तिचे वडील श्रीकृष्ण पुंजरवाड हे जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी नोकरीत रुजू होताना महादेव कोळी समाजाचे जात प्रमाणपत्र दिल्याने त्यांना अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाल्या. त्यांच्या जात प्रमाण पत्राच्या आधारे मयुरीलाही वैद्यकीय शिक्षणात अनुसूचित जमातीच्या सुविधा मिळाल्या. त्यानंतर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने त्यांच्या जात प्रमाणपत्राची फेर तपासणी केली. त्यावेळी श्रीकृष्ण पुंजरवाड हे मूळ कोळी समाजाचे असल्याचा निष्कर्ष समितीने काढला. त्यांच्या निकटच्या व रक्ताच्या नातेवाईकाच्या जात प्रमाण पत्रातील त्रुटीही समितीने समोर ठेवल्या. त्यांच्या नातेवाईकांनी जात प्रमाणपत्रात बदल केल्याचा निष्कर्षही समितीने काढला. जात प्रमाण पत्राबद्दल विस्तृत अहवाल समितीने दिला.

हिंदुत्व आडवे आले : समितीने पुंजरवाड यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवताना ते महादेवाची पूजा करत असल्याने ते महादेव कोळी नसून ते हिंदू असल्याचे अहवालात म्हटले ( Worshiping Mahadev invalidated caste certificate ) आहे. समितीने नोंदविलेल्या या आक्षेपामुळे महादेव कोळी समाज संतप्त झाला आहे. समितीने पुंजरवाड यांच्या रक्तातील नातेवाईकांच्या जात प्रमानपत्रातील तफावती सोबत त्यांच्या धार्मिक चालीरीतीही अधोरेखित केल्या आहेत. महादेवाची पूजा, लग्न, जेजुरीची वारी, गोंधळ आदी प्रथावरून समितीने पुंजरवाड याना अनुसूचित जमातीचे न ठरवता हिंदू ठरवले ( tribal community Caste certificate invalid ) आहे. पुंजरवाड यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने मयुरीचे वैद्यकीय उच्च शिक्षण अडचणीत आले आहे. त्यासोबत धार्मिक चालीरीतीवर बोट ठेवल्याने समाजात असंतोष पसरला आहे. महादेव कोळी समाजाच्या वतीने दि. ५ रोजी देवी देवतांच्या मूर्ती घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

Last Updated : Jan 4, 2023, 1:17 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.