ETV Bharat / state

दारू बंद करा तरच सरपंच, उपसरपंच निवडा; महिलांचा ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या - नायगाव ग्रामपंचायत कार्यालय बातमी

महाराष्ट्र-तेलंगाणा राज्याच्या सीमेलगत असलेल्या धर्माबाद तालुक्यातील नायगाव (ध) या गावातील महिलांनी हे आंदोलन केले आहे. गावात एक परवानाधारक देशी दारू दुकान आहे. या गावात दारुड्यांचा त्रास वाढला असून गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थीही देशी दारू पिऊन गोंधळ घालत आहेत.

nanded
नायगावमधील महिलांचे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन
author img

By

Published : Feb 10, 2021, 3:41 PM IST

नांदेड - दारू बंदीसाठी धर्माबाद तालुक्यातील महिलांनी दुर्गेचे रुप धारण केलं आहे. दारु दुकान हटवा मगच सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड करा, अशी मागणी महिलांनी केली आहे. या मागणीसाठी धर्माबाद तालुक्यातील नायगाव येथील महिलांनी ठिय्या आंदोलन केले आहे. नायगाव ग्रामपंचयतीसमोर हे आंदोलन केलं आहे.

सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीची सभा तहकूब-

दारू दुकानं बंद करा या मागणीसाठी नायगावच्या संतप्त रणरागिणींनी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडी दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयासमोर चार तास ठिय्या दिला. आंदोलन करून सदस्यांना कार्यालयात जाण्यास प्रतिबंध केला. रणरागिनींच्या ठिय्या आंदोलनामुळे सरपंच, उपसरपंच निवडीची सभा तहकूब करण्यात आली.

वयोवृद्धांसोबत लहान मुलं देखील व्यसनाधीन-

महाराष्ट्र-तेलंगाणा राज्याच्या सीमेलगत असलेल्या धर्माबाद तालुक्यातील नायगाव (ध) या गावातील महिलांनी हे आंदोलन केले आहे. गावात एक परवानाधारक देशी दारू दुकान आहे. या गावात दारुड्यांचा त्रास वाढला असून गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थीही देशी दारू पिऊन गोंधळ घालत आहेत. हा प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने महिलांनी दारुबंदीसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

दोन महिन्यापासून आंदोलन-

दारू बंदीसाठी नायगाव येथील महिलांनी एकत्र येत लढा सुरू केला आहे. तालुका प्रशासनाला तक्रार देऊनही काहीच फायदा झाला नाही. त्यानंतर सर्व महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती. तक्रार करुनही दुकान बंद होत नसल्याने संतापलेल्या रणरागिणी सोमवारी सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडी दरम्यान नूतन सदस्यांना ग्रामपंचायत कार्यालयात जाण्यास प्रतिबंध केला. पहिले दारु दुकान हटवा, मगच सरपंच, उपसरपंच निवडा अशा गर्जना करीत ठिय्या आंदोलन केले. उपसरपंच होणाऱ्या सदस्यांच्या हातातील अर्ज घेऊन बाहेर हाकलून दिले. दारु दुकानदारांच्या गटाच्या एकही सदस्यांना आत जाऊ दिले नाही. दरम्यान, गावचे सरपंचपद अनु. जातीसाठी राखीव असल्याने नागेंद्र सूर्यकार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. तर उपसरपंच पदासाठी चंद्राबाई बुयेवाड यांचाही एकच अर्ज दाखल झाला. मात्र कोरमअभावी सोमवारची सभा तहकूब करण्यात आली. यावेळी तहसीलदार दत्तात्रय शिंदे, निवडणूक अधिकारी जी.एस. गरूडकर, तलाठी यु.डब्लू. आडे, ग्रामसेवक एस.एस. जैस्वाल यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.