नांदेड - ट्रकच्या चाकाखाली दुचाकी सापडून एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निकिता जाधव (वय 21, पासदगाव) असे या मुलीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील मालेगाव रस्त्यावर स्कुटीवरून कॉलेजला जाणाऱ्या दोन तरुणींची गाडी अचानक स्लिप झाली. त्यामुळे मागून येणाऱ्या ट्रकच्या टायरखाली तरुणी आली. त्यात स्कुटीवर मागे बसलेल्या मुलीचा मृत्यू झाला. निकिता जाधव ही बीसीएच्या दुसऱ्या वर्षात शिकायला होती.
दरम्यान, या रस्त्याचे काम सुरू असताना रस्ता खाली-वर असल्यामुळे हा अपघात झाला आहे. रस्त्याच्या ठेकेदाराने यात पुरेशी काळजी घेतलेली नाही. त्यामुळेच हा अपघात झाला असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. तसेच, येथे रस्त्याचे काम सुरू असल्याचे फलकदेखील लावण्यात आले नाहीत.