नांदेड : काँग्रेसच्या एका महिला कार्यकर्तीवर गोळाबार झाल्याची घटना घडली आहे. जखमी सविताला विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात ( Vishnupuri Government Hospital ) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ( Woman Congress Worker firing )
हल्लेखोरांनी केला गोळीबार : पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बाफना पुलावरून मगनपुराच्या दिशेने स्कूटीवरून जात असलेल्या सविता गायकवाड ( Savita Gaikwad ) यांना रात्री ११.१० वाजेच्या सुमारास परभणी येथील रहिम खान, जाफर व एक अनोळखी रहिवासी या तिघांनी अचानक अडवले. सोमवार, 9 जानेवारी रोजी तिघांचा सविता यांच्याशी वाद झाला, यादरम्यान हल्लेखोरांनी सवितावर रिव्हॉल्व्हरने गोळीबार केला. त्यात सविताच्या डाव्या हाताला गोळी लागली. या प्रकरणाची माहिती मिळताच इतवारा पोलीस ठाण्याचे ( Itwara Police Station ) निरीक्षक भगवान धबडगे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून जखमी सविता यांचा आढावा घेतला. सविता यांना पोलिसांच्या वाहनातून विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. तर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : आयशरच्या खरेदी-विक्री संदर्भात काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील भोकर तहसील पोलिस ठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्या सविता गायकवाड आणि गोळीबारात जखमी झालेल्या अतिख नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. वाहने या प्रकरणी परभणी जिल्ह्यातील रहीम खान यांनी साक्ष दिली होती.अतिखला पोलिसांनी अटक केली होती, तर सविता गायकवाड यांना नोटीस बजावून सोडण्यात आले होते. त्यामुळे सविता गायकवाड आणि फैसल नावाच्या व्यक्तीने ७ जानेवारीला परभणी गाठून या खटल्यातील साक्षीदार रहीम खानच्या घरी गोंधळ घातला, त्यामुळे रहीमने नांदेडला येऊन सविता गायकवाड यांच्यावर गोळीबार केला असा तिघांवर आरोप केला. ( Nanded Crime News )
सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी : दरम्यान, इतवारा पोलीस ठाण्यात रहीम खान, जफर आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरे तर हे संपूर्ण प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे आहे, याच्या अधिक तपास केला जाईल, तसेच घटना स्थळाच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करण्यात आली आहे असे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले