ETV Bharat / state

Nanded Development Project : सत्ता बदलानंतर नांदेडच्या विकास कामांना ब्रेक लागणार का?

गेल्या अडीच वर्षांत नांदेड जिल्ह्यात विकासाने गती पकडली होती. नांदेड शहरात अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी अनेक उड्डाणपुलांसाठी मंजुरी आणली ( Nanded Development Project ) होती. केंद्रीय महामार्ग, राज्य महामार्ग याला मंजुरी देऊन नांदेड शहराला हे मार्ग जोडण्यासाठी प्रयत्न केले, पण आता सरकार कोसळल्याने जिल्ह्यातील ती कामे पूर्ण होणार की प्रस्थापितांचे राजकीय खच्चीकरण करताना विकास रखडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nanded Development Project
अशोक चव्हाण
author img

By

Published : Aug 4, 2022, 9:37 AM IST

नांदेड - राज्यात सत्तांतर झाले व ठिकठिकाणची राजकीय गणिते बदलली. मागील अडीच वर्षांच्या काळात नांदेड जिल्ह्यात विकास कामांनी पकडलेली गती कायम राहील की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माजी मुख्यमंत्री व महाविकास आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री असलेल्या अशोक चव्हाणांनी ( Ashok Chavan ) राजकीय वजन वापरून अनेक कामे खेचून आणली. पण आता सरकार कोसळल्याने जिल्ह्यातील ती कामे पूर्ण होणार की प्रस्थापितांचे राजकीय खच्चीकरण करताना विकास रखडणार ( Nanded Development Project ), याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, गेल्या अडीच वर्षांत नांदेड जिल्ह्यात विकासाने गती पकडली होती. नांदेड शहरात अशोक चव्हाण यांनी अनेक उड्डाणपुलांसाठी मंजुरी आणली होती. केंद्रीय महामार्ग, राज्य महामार्ग याला मंजुरी देऊन नांदेड शहराला हे मार्ग जोडण्यासाठी प्रयत्न केले. बांधकाम खाते त्यांच्याकडे असल्याने शहरातील विविध रस्त्यांना निधी उपलब्ध करून हे रस्ते चौपदरीकरण्याचे काम सुरू झाले होते. तसेच नांदेड जिल्ह्यातील विविध जिल्हा मार्ग, महामार्ग, राज्य मार्गांच्या रस्त्यांना निधी उपलब्ध केला गेला. राज्य सरकारकडून कोट्यवधींचा निधी विविध योजनांसाठी दिला. नवीन सरकार आल्याने जिल्ह्याला एखाद-दुसरे मंत्रिपद मिळाले. तरी दीर्घ राजकीय अनुभवाचा अभाव असल्याने त्याचा वापर किती होतो, हा मोठा प्रश्न असल्याचे राजकीय जाणकार म्हणतात.

हेही वाचा - Cabinet Decision : मंत्रिमंडळ निर्णय ‘झेडपी’च्या सदस्यसंख्येबाबत राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

राजकीय बलाबल - विधानसभा मतदारसंघ 09, खासदार भाजप 01, भाजपचे आमदार 03, भाजप वि. प. आमदार 01, काँग्रेसचे आमदार 04, वि. प. आमदार काँग्रेस 01, शिवसेना आमदार 01, शेकाप आमदार 01.

ही विकासकामे लांबणीवर पडणार?-

  1. जालना-नांदेड समृद्धी मार्ग, मुंबई-जालना-हैदराबाद बुलेट ट्रेनसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे.
  2. गोदावरीचे ६४ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळावे हा निर्णय घेतला होता.
  3. ४० नवीन प्रकल्प, ७ पैनगंगेवरील प्रकल्प, नांदेड येथील लेंडी प्रकल्प पुनर्वसन प्रश्न.
  4. जिल्हा न्यायालयाच्या इमारती, जिल्हा शासकीय संकुल.
  5. ३०० खाटांचे जिल्हा रुग्णालय, नांदेड ते बासर मार्ग अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प.
  6. विभागीय महसूल आयुक्तालय, नांदेड पोलीस आयुक्तालय.
  7. नांदेड शहरात सध्या सुरू असलेली १५० कोटींची रस्त्यांची कामे रखडू शकतात.

हेही वाचा - Supreme court hearing : शिंदे फडणवीस सरकार बेकायदेशीर की कायदेशीर? आज सर्वोच्च न्यायालयातील कामकाजात असणार पहिलीच सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.