ETV Bharat / state

महापौराची माळ कुणाच्या गळ्यात...? नांदेड महापालिकेत महापौर निवडीच्या हालचालींना वेग - congress

लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर त्यांना चार महिने जास्तीचा कालावधी मिळाला आहे. अनेक इच्छुकांनी आता मोर्चेबांधणी सुरू केली असून, पक्षश्रेष्ठींकडे संधीची मागणी केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच महापौर निवड होण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे.

नांदेड महापालिका
author img

By

Published : May 5, 2019, 7:45 AM IST

नांदेड - काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी नांदेडच्या महापौर शिला भवरे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता आचारसंहिता संपल्यानंतर तसेच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महापौरांचा राजीनामा घेऊन नवीन महापौरांच्या निवडीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून या हालचालींनी वेग घेतला आहे.

महापौर पद सव्वा वर्षाचे ठरले असतानाही विद्यमान महापौर शिला भवरे यांना लोकसभा निवडणुकीमुळे जास्तीचा कालावधी मिळाला होता. या पदावर संधी मिळावी यासाठी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत .

नांदेड महापालिकेची निवडणूक ऑक्टोबर २०१७ मध्ये झाली. त्यामध्ये ८१ पैकी काँग्रेसला ७३ जागा मिळाल्या. ६ जागांवर भाजप, तर एका जागेवर शिवसेनेचा सदस्य निवडून आला होता. एक जागा अपक्षाला मिळाली असून, त्याने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचे संख्याबळ सर्वात जास्त असल्यामुळे प्रत्येकाला कुठे ना कुठे संधी मिळावी, यासाठी सव्वा सव्वा वर्षाचे पदाधिकारी निवडायचे ठरले होते. त्यानुसार सुरुवातीला एक नोव्हेंबर २०१७ रोजी महापौर म्हणून शिला किशोर भवरे, तर उपमहापौर म्हणून विनय गिरडे पाटील यांना संधी देण्यात आली होती.

लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर त्यांना चार महिने जास्तीचा कालावधी मिळाला आहे. अनेक इच्छुकांनी आता मोर्चेबांधणी सुरू केली असून, पक्षश्रेष्ठींकडे संधीची मागणी केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच महापौर निवड होण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे.

दरम्यान, महापौर पदासाठी अनेकजण इच्छुक असून त्यामध्ये ज्योती रायबोले, पूजा पवळे, ज्योती कदम, गंगाबाई सोनकांबळे, गितांजली कापुरे, दीक्षा धवाले, ज्योत्स्ना गोडबोले, चित्रा गायकवाड यांची नावे चर्चेत आली आहेत . मात्र , निवडीचा अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हेच घेणार असल्यामुळे त्यांच्या कोर्टातच अंतिम निर्णय होणार आहे.

Intro:नांदेड महापौर बदलाच्या हालचालींना वेग;
अनेक इच्छुक मुंबईला रवाना...!

नांदेड : काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी महापौर शीला भवरे यांचा राजीनामा मागितला आहे . त्यामुळे आता आचारसंहिता संपल्यानंतर तसेच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महापौरांचा राजीनामा घेऊन नवीन महापौरांच्या निवडीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून या हालचालीनी वेग घेतला आहे. पक्षश्रेष्ठींकडूनही याला दुजोरा मिळाला आहे. अनेक इच्छुक मुंबईला रवाना झाल्याची माहिती आहे.Body:नांदेड महापौर बदलाच्या हालचालींना वेग;
अनेक इच्छुक मुंबईला रवाना...!

नांदेड : काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी महापौर शीला भवरे यांचा राजीनामा मागितला आहे . त्यामुळे आता आचारसंहिता संपल्यानंतर तसेच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महापौरांचा राजीनामा घेऊन नवीन महापौरांच्या निवडीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून या हालचालीनी वेग घेतला आहे. पक्षश्रेष्ठींकडूनही याला दुजोरा मिळाला आहे. अनेक इच्छुक मुंबईला रवाना झाल्याची माहिती आहे.

महापौर पद सव्वा वर्षाचे ठरले असतानाही विद्यमान महापौर शीला भवरे यांना लोकसभा निवडणुकीमुळे जास्तीचा कालावधी मिळाला होता. या पदावर इतर काँग्रेस पदाधिकारी यांना संधी मिळावी यासाठी तात्काळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत .

नांदेड महापालिकेची निवडणूक अक्टोबर २०१७ मध्ये झाली. त्यामध्ये ८१ पैकी काँग्रेसला ७३ जागा मिळाल्या. सहा जागांवर भाजप तर एका जागेवर शिवसेनेचा सदस्य निवडून आला होता. एक जागा अपक्षाला मिळाली असून त्याने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचे संख्याबळ सर्वात जास्त असल्यामुळे प्रत्येकाला कुठे ना कुठे संधी मिळावी, यासाठी सव्वा सव्वा वर्षाचे पदाधिकारी निवडायचे ठरले होते. त्यानुसार सुरवातीला एक नोव्हेंबर २०१७ रोजी महापौर म्हणून शिला किशोर भवरे , तर उपमहापौर म्हणून विनय गिरडे पाटील यांना संधी देण्यात आली होती.
महापौर पदासाठी अनेक इच्छुक असतानाही त्यांना संधी देण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर त्यांना चार महिने जास्तीचा कालावधी मिळाला आहे. अनेक इच्छूकांनी आता मोर्चेबांधणी सुरू केली असून पक्षश्रेष्ठींकडे संधीची मागणी केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच महापौर निवड होण्याची शक्यता असून त्या दृष्टीने हालचालीना वेग आला आहे.
दरम्यान , महापौर पदासाठी अनेकजण इच्छुक असून त्यामध्ये ज्योती रायबोले, पूजा पवळे, ज्योती कदम, गंगाबाई सोनकांबळे, गितांजली कापुरे, दीक्षा धवाले, ज्योत्स्ना गोडबोले, चित्रा गायकवाड यांची नावे चर्चेत आली आहेत . मात्र , निवडीचा अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हेच घेणारे असल्यामुळे त्यांच्या कोर्टातच अंतिम निर्णय होणार आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.