ETV Bharat / state

गोदावरी नदीपात्रात सेल्फी काढताना तिघे गेले वाहून; एकाचा मृतदेह सापडला - नगीनाघाट

गणेश विसर्जन पाहण्यासाठी गेलेले तिघे जण वाहून गेल्याची घटना घडली होती. या तिघांपैकी शुक्रवारी एकाचा मृतदेह सापडला असून दोघांची शोधमोहीम सुरू आहे.

एकाचा मृतदेह सापडला
author img

By

Published : Sep 14, 2019, 10:43 AM IST

नांदेड - नगीनाघाट येथे गणेश विसर्जनावेळी सेल्फी काढताना तिघे जण वाहून गेल्याची घटना घडली होती. त्यामुळे प्रशासनाने नदी परिसरात शोधमोहीम सुरु केली. या तिघांपैकी शुक्रवारी एकाचा मृतदेह सापडला असून दोघांची शोधमोहीम सुरू आहे.

नांदेड शहरातील बहुतांश गणेश मंडळाचे विसर्जन शहरा नजीकच्या बंदाघाट तसेच नगीनाघाट येथे केले जाते. गुरुवारी सायंकाळी या घाटावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. याच विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी अरविंद निषाद (वय १९), रामनिवास निषाद (वय २०) आणि धर्मेंद्र धरमंडरा (वय १७) हे तिघे नगीनाघाट येथे गेले होते. गोदावरी नदीपात्रात विष्णुपूरीतून पाणी सोडल्याने नदी प्रवाहित झाली होती. नदीपात्रात उतरताच पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने हे तीनही तरूण नदीत वाहून गेले. हे तीनही युवक उत्तर प्रदेशातील आझमगढ येथील आहे. ते जून महिन्यात बांधकाम मजूर कामावर शहरात आले होते. गोदावरी जीवरक्षक जिल्हा प्रशासनाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्नीशामन दल आणि पोलिसांच्या वतीने या तीन तरुणांचा शोध घेतला जात आहे. या तिघांपैकी धर्मेंद्र रमेश निषाद याचा मृतदेह शुक्रवारी सापडला असून इतरांची शोधमोहीम सुरू आहे. याप्रकरणी नंदी नगीना निशाद यांनी दिलेल्या तक्रारीवरून वजीराबाद पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे.

Intro:गोदावरी नदीपात्रात सेल्फी काढताना तिघे जण वाहून गेले; एकाचा मृतदेह सापडला...!

नांदेड: गणेश विसर्जन पाहण्यासाठी नगीनाघाट येथे गेलेले तिघे जण वाहून गेले होते. या अनुषंगाने प्रशासनाने नदी परिसरात शोधमोहीम हाती घेतली आहे़. हे तीनही युवक उत्तर प्रदेशातील आझमगढ येथील असून जूनमध्ये ते नांदेडमध्ये बांधकाम मजूर म्हणून आले होते़. या तिघांपैकी शुक्रवारी एकाचा मृतदेह सापडला असून दोघांची शोधमोहीम सुरू आहे.
Body:गोदावरी नदीपात्रात सेल्फी काढताना तिघे जण वाहून गेले; एकाचा मृतदेह सापडला...!

नांदेड: गणेश विसर्जन पाहण्यासाठी नगीनाघाट येथे गेलेले तिघे जण वाहून गेले होते. या अनुषंगाने प्रशासनाने नदी परिसरात शोधमोहीम हाती घेतली आहे़. हे तीनही युवक उत्तर प्रदेशातील आझमगढ येथील असून जूनमध्ये ते नांदेडमध्ये बांधकाम मजूर म्हणून आले होते़. या तिघांपैकी शुक्रवारी एकाचा मृतदेह सापडला असून दोघांची शोधमोहीम सुरू आहे.

नांदेड शहरातील बहुतांश गणेश मंडळाचे विसर्जन शहरा नजीकच्या बंदाघाट तसेच नगीनाघाट येथे केले जाते़ त्यामुळे गुरुवारी सायंकाळी या घाटावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती़ याच विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी मिस्त्री कामानिमित्त उत्तर प्रदेश येथील तरुण नांदेड येथे आलेले अरविंद निषाद (वय १९), रामनिवास निषाद (वय २०) आणि धर्मेंद्र धरमंडरा (वय १७) हे तिघे नगीनाघाट येथे गेले होते़ गोदावरी नदीपात्रात विष्णुपूरीतून पाणी सोडल्याने नदी प्रवाहित झाली होती़

नदीपात्रात उतरताच पाण्याचा मोठा प्रवाह आल्याने हे तीनही तरूण नदीत वाहून गेले़ सुरुवातीला प्रशासनाकडून अशी कुठलीही घटना घडली नसल्याचे सांगितले होते़ मात्र त्याचवेळी दुसरीकडे पोलिसांच्या वतीने शोधही सुरू करण्यात आला होता़ शुक्रवारी ठेकेदार नंदी मिस्त्री यांनी वजिराबाद पोलिस ठाण्यात तीन्ही तरूण वाहून गेल्याची तक्रार दिली़ त्यानंतर शोधकार्याने आणखी वेग घेतला़. गोदावरी जीवरक्षक जिल्हा प्रशासनाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्नीशमन दल आणि पोलिसांच्या वतीने या तीन तरुणांचा शोध घेतला जात आहे़. या तिघांपैकी धर्मेंद्र रमेश निषाद याचा मृतदेह शुक्रवारी सापडला असून इतरांची शोधमोहीम सुरू आहे. या प्रकरणी नंदी नगीना निशाद यांनी दिलेल्या तक्रारीवरून वजीराबाद पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास नायक शिंदे हे करत आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.