नांदेड - महिनाभरापूर्वी वजिराबाद भागात झालेल्या गोळीबार प्रकरणातील तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्यानंतर पोलिसांनी आता या आरोपींविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आणखी एका आरोपीला अटक करून त्याला मोक्का न्यायालयासमोर उभे केले असता, त्याला पाच दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा - सोलापूरमध्ये प्रेम प्रकरणातून दहावीच्या मुलीची आत्महत्या
या कारवाईमुळे उजळमाथ्याने फिरणारे गुन्हेगार हादरून गेले आहेत. ४ सप्टेंबर २०१९ रोजी शहराच्या वजिराबाद भागात मध्यरात्री गोळीबार झाला होता. या गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी शेख अन्वर अली खान अकबर अली खान (वय-४२) आणि प्रदीप उर्फ सोनू लालचंद्र रौत्रे (३२) या दोघांना पकडले. यांच्याविरुध्द भारतीय दंड संहितेच्या ३०७ नुसार गुन्हा दाखल केला होता. पुढे या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासाला अनुसरुन, त्यातील तथ्य आणि पुरावे पाहून पोलिसांनी सुचविलेल्या आरोपीविरुध्द मोक्का कायदा जोडण्याची परवानगी दिली. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक अभिजित फस्के यांच्याकडे वर्ग झाला आहे. अगोदर दाखल झालेल्या ३०७ या कलमाला मोक्का कायद्याची जोड लागल्यानंतर अभिजित फस्के यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांच्या पथकाने अन्य एका आरोपीस ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - रिसोड शहरात चाकूने भोसकून युवकाची हत्या
आरोपीस औरंगाबादच्या मोक्का न्यायालयाने १४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. या गुन्ह्यातील शेख अन्वर अली खान, प्रदीप उर्फ सोनू रौत्रे आणि रविंद्रसिंघ उर्फ टायगर उर्फ शेरा हे तीनजण तुरुंगात आहेत. तर एक आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.