ETV Bharat / state

विष्णुपुरीतील मृत जलसाठ्यात ४ इंचाने झाली वाढ; पाण्यावर राहणार १५ दिवस पहारा - महापौर

नांदेडमध्ये सिद्धेश्वर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यावर आणखी १५ दिवस पोलिसांसह महापालिका, पाटबंधारे विभागाच्या पथकांचा पहारा राहणार आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी ३ वाजेपासून विष्णुपुरीत दाखल झालेल्या पाण्यामुळे मृत जलसाठ्यात ४ इंचाची वाढ झाली आहे.

विष्णुपुरीतील मृत जलसाठ्यात ४ इंचाने झाली वाढ
author img

By

Published : Jun 16, 2019, 12:46 PM IST

Updated : Jun 16, 2019, 2:49 PM IST

नांदेड - शहराची तहान भागविण्यासाठी सिद्धेश्वर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यावर आणखी १५ दिवस पोलिसांसह महापालिका, पाटबंधारे विभागाच्या पथकांचा पहारा राहणार आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी ३ वाजेपासून विष्णुपुरीत दाखल झालेल्या पाण्यामुळे मृत जलसाठ्यात ४ इंचाची वाढ झाली आहे.

विष्णुपुरीतील मृत जलसाठ्यात ४ इंचाने झाली वाढ

वसमतपासून पाण्यावर या पथकांची नजर राहणार आहे. वसमत, औंढा आणि नांदेड अशा तीन विभागांत पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत अधीक्षक अभियंता सब्बीनवार यांनी सिद्धेश्वर धरणातून नांदेडपर्यंत येणारा पाण्याचा आढावा घेतला. यावेळी कार्यकारी अभियंता एस. बी. बिराजदार, बी. डी. भालेराव, कार्यकारी अभियंता नीळकंठ गव्हाणे, महापालिकेचे उपायुक्त विलास भोसीकर, उपअभियंता संघरत्न सोनसळे, अविनाश अटकोरे, रमेश चौरे, सदाशिव पतंगे आदींची उपस्थिती होती.

सिद्धेश्वर धरणातून विष्णुपुरी प्रकल्पात सोडण्यात येणाऱ्या १५ पैकी ५ दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. आणखी १० दलघमी पाणी सोडणे शिल्लक असून हे पाणी सोडले जात आहे. पाण्याचा अवैध उपसा होऊ नये, पाण्याची चोरी होऊ नये यासाठी पथकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी पोलिसांचीही मदत घेण्यात येणार आहे. पोलिसांचीही स्वतंत्र पथके राहणार आहेत.

डिसेंबरपासूनच विष्णुपुरी प्रकल्पातून होणारा अवैध पाणी उपसा बंद करणे आवश्यक होते. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यामुळे आज शहरातील नागरिकांसमोर जलसंकट उभे राहिले आहे. अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी स्थापन केलेल्या पथकांच्या नाकर्तेपणामुळे ही टंचाई उद्भवली असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महापौर दीक्षा धबालेंसह स्थायी समिती सभापती फारुख अली खान, सभागृह नेते विरेंद्र सिंघ गाडीवाले, उमेश चव्हाण, किशोर स्वामी, अब्दुल सत्तार, विनय गिरडे, दुष्यंत सोनाळे आदींनी केली आहे.

Intro:नांदेड - पाण्यावर राहणार १५ दिवस पहारा.

- विष्णुपुरीतील मृत जलसाठ्यात चार इंचाने झाली वाढ.
- सिद्धेश्वर धरणातून आतापर्यंत १५ पैकी ५ दलघमी पाणी विष्णुपुरी प्रकल्पात सोडले.
- २१ पथकासह पोलिसांची राहणार पाण्यावर गस्त.

नांदेड : शहराची तहान भागविण्यासाठी सिद्धेश्वर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यावर आणखी १५ दिवस पोलिसांसह महापालिका,पाटबंधारे विभागाच्या पथकांचा पहारा राहणार आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी तीन वाजेपासून विष्णूपुरी दाखल झालेल्या
पाण्यामुळे मृत जलसाठ्यात चार इंचाची वाढ
झाली आहेBody:वसमत पासून पाण्यावर या पथकांची नजर राहणार आहे. वसमत, औंढा आणि नांदेड अशा तीन विभागांत पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत अधीक्षक अभियंता सब्बीनवार यांनी सिद्धेश्वर धरणातून नांदेड पर्यंत येणारा पाण्याचा आढावा घेतला. यावेळी कार्यकारी
अभियंता एस. बी. बिराजदार, बी. डी. भालेराव,
कार्यकारी अभियंता नीळकंठ गव्हाणे,महापालिकेचे उपायुक्त विलास भोसीकर,उपअभियंता संघरत्न सोनसळे, अविनाश अटकोरे, रमेश चौरे, सदाशिव पतंगे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, सिद्धेश्वर धरणातून विष्णूपुरी प्रकल्पात सोडण्यात येणा-या १५ पैकी ५ दलघमी पाणी सोडण्यात आले आहे.
आणखी १० दलघमी पाणी सोडणे शिल्लक आहे.हे पाणी सोडले जात आहे. पाण्याचा अवैध उपसा होऊ नये, पाण्याची चोरी होऊ नये यासाठी पथकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.यासाठी पोलिसांचीही मदत घेण्यात येणार आहे. पोलिसांचीही स्वतंत्र पथके राहणार आहेत. दरम्यान, महापौर दीक्षा
धबाले यांनी शहरातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईस कारणीभूत असलेल्या अधिकारी कर्मचा-यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. Conclusion:डिसेंबरपासूनच विष्णुपरी प्रकल्पातून होणारा अवैध पाणी उपसा बंद करणे आवश्यक होते.पण प्रत्यक्षात तसे झाले नाही.त्यामुळे आज शहरातील नागरिकांसमोर जलसंकट उभे राहिले आहे.अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी स्थापन केलेल्या पथकांच्या नाकर्तेपणामुळे ही टंचाई उद्भवली असून
त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा,अशी मागणी महापौर दीक्षा धबालेंसह स्थायी समिती सभापती फारुख अली खान,सभागृह नेतेविरेंद्रसिंघ गाडीवाले, उमेश चव्हाण,किशोर स्वामी,अब्दुल सत्तार, विनय गिरडे,दुष्यंत सोनाळे आदींनी केली आहे.
Last Updated : Jun 16, 2019, 2:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.