ETV Bharat / state

Border Dispute : गावात मूलभूत सुविधांचा अभाव; गावकऱ्यांनी तेलंगणाला जोडण्याची केली मागणी - गावकऱ्यांनी तेलंगणाला जोडण्याची केली मागणी

तेलंगणा आणि कर्नाटक सीमेवरच्या ( Telangana and Karnataka border ) देगलूर तालुक्यातील मानूर इथल्या गावकऱ्यांनी तेलंगणाला जोडण्याची मागणी केली आहे. गावाच्या सरपंचानी थेट नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना तसे पत्र (Letter to Collector of Nanded ) पाठवून ही विनंती केली आहे. तेलंगणा आणि कर्नाटकच्या सीमेपासून अवघे दीड किलोमीटर अंतर असलेल्या गावांत मूलभूत सुविधांचा अभाव आहे, त्यामुळे गावकऱ्यांनी तेलंगणा राज्यात जोडा (Add to Telangana State) अशी मागणी केली आहे.

Telangana and Karnataka border
तेलंगणा आणि कर्नाटक सीमा
author img

By

Published : Dec 19, 2022, 3:36 PM IST

तेलंगणा आणि कर्नाटक सीमा

नांदेड : महाराष्ट्रातील मानूर गावांत मूलभूत सुविधांचा अभाव आहे, त्यासोबतच गावाला जोडणारा रस्ता एकही चांगल्या स्वरूपाचा नाही, त्यामुळे गावकऱ्यांनी तेलंगणा कर्नाटकच्या धर्तीवर आमचा विकास करा अन्यथा आम्हाला तेलंगणा राज्यात जोडा Add to Telangana State अशी मागणी केली आहे. ( border dispute) तेलंगणा आणि कर्नाटक सीमेवरच्या ( Telangana and Karnataka border ) देगलूर तालुक्यातील मानूर इथल्या गावकऱ्यांनी तेलंगणाला जोडण्याची मागणी केली आहे. गावाच्या सरपंचानी थेट नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना तसे पत्र ( Letter to Collector of Nanded ) पाठवून ही विनंती केली आहे. धर्माबाद तालुक्यातील काही गावांनी या पूर्वी अशीच मागणी केली होती. त्या पाठोपाठ आता देगलूर तालुक्यातील मानूर इथल्या गावकऱ्यांनी ही मागणी केली आहे. महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर border of Maharashtra Telangana वसलेल्या महाराजगुडा, नाके वाडा यासह १४ गावांतील ग्रामस्थांनी तेलंगणात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्या सीमाभागाचा प्रश्न महाराष्ट्रात तापत असताना आणखी १४ गावांनी सीमावादामध्ये उडी घेतल्याने महाराष्ट्र सरकारचे टेन्शन वाढले आहे. Villagers express willingness to join Telangana

जिल्ह्याच्या दर्जाचा प्रश्न टांगता : तेलंगणा राज्याच्या किनारपट्टीवरील किनवट तालुक्यातील कांही गावांसह भूभाग हा तेलंगणा राज्याकडे जोडण्याचा राग आळवला जाऊ लागला आहे. अनेक ग्रामपंचायतींनी तसे ठराव महाराष्ट्र व तेलंगणा सरकारकडे पाठवल्याची स्पष्टोक्ती तेलंगणा समाविष्ठ संघर्ष समिती अध्यक्ष विठ्ठलराव नाईकांनी केली. ओलीतक्षेत्रासाठी जलाशये नाहीत. नविन तालुके व किनवटला जिल्ह्याच्या दर्जाचा प्रश्न टांगता ठेवलाय. कारखानदारी आणि उद्योगधंदे नसल्याने बेकारीच्या संख्येतही लक्षवेधीवृद्धी समोर ठेऊन किनारपट्टीवरील कांही गावांसह भूभाग तेलंगणाशी जोडलेलाच बरा असे म्हटले आहे. सरकार आणि प्रशासनाने गांभीर्याने घेऊन खरंच ती गावे उपेक्षित आहेत काय ? नागरी सुविधा पोहोचल्या नाहीत काय ? याचाही शासन स्तरावरचा लेखाजोखा पहाणे उचित ठरेल.

तेलंगनात समाविष्ठ करा : नागरीकांच्या मनात असलेली या खदखदीचे केंव्हा स्पोट होईल हे सांगणे अवघड असले तरी याची सुरवात बार असोसिएशन किनवटच्यावतीने केली गेली असल्याचे मागील आठवड्यापासुन घडत असलेल्या घडामोडीवरून निदर्शनास येत आहे. किनवट येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय निर्माण करा, अन्यथा आम्ही तेलंगणा राज्यात समाविष्ठ होऊ व तेलंगना राज्यात समाविष्ठ करण्याकरिता मागणी करुन असा आक्रमक पवित्रा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. अरविंद चव्हाण यांनी सहकारी वकिलासह घेतल्याचे माध्यमांमध्ये प्रकाशित होताच या संदर्भात असहकार आंदोलन व कामबंद आंदोलन हे किनवट वकिल महासंघातर्फे करण्यात आल्यानंतर जिल्हा न्यायाधिशांनी किनवट येथिल वकिल महासंघाची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली आहे.

किनवट तालुक्यातील शेवटचे गाव : परंतु अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय हे नांदेड पासुन जेमतेम ५० कि. मी. एवढ्या अंतरावर असलेल्या मुखेड, बिलोली, कंधार, भोकर याठीकाणी आहेत, परंतु किनवट हे १५० कि. मी. तर किनवट तालुक्यातील शेवटचे गाव हे नांदेड पासुन २१० कि. मी अंतरावर आहे. हा एकप्रकारे अन्यायच आहे. जो कि किनवट तालुक्यावर सुमारे ७५ वर्षापासुन अन्य्यायच चालु आहे. कारण अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात किनवट येथे असेल तर हत्या, रेप, अट्रोसिटी, विमा दावे, शासनाविरुध्द दाखल करावयाचे दावे या व अशा विविध प्रकरणाकरिता जामिण मिळवणे व दावे दाखल करण्याकरिता किनवट येथिल नागरीकांना नांदेड येथे फेऱ्या माराव्या लागतात.

आंदोलन वाढणार : फेऱ्या बंद करण्याची आता वेळ आली असुन या होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडन्याकरिता नागरीकांनी एकत्र येण्याची आवश्यकता असुन ज्या प्रकारे रेल्वे रुंदीकरणा करिता सर्व पक्षिय, सर्व पत्रकार संघ, व्यापारी असोसिएशन, बाजार समिती यांच्यासह विविध संघटनांनी रान उभे केले होते, तशा प्रकारचे तिव्र आंदोलन पुन्हा एकदा किनवट तालुक्यात उभे करण्याची आवश्यकता असल्याचे सर्वत्र सामाजिक कार्यकत्यांकडुन चर्चिले जात आहेत. तर आगामी काळात हे आंदोलन हळुहळु तिव्र रुप घेतांना दिसणार यात शंका नाही. कारण किनवट वकिल महासंघाकडुन छेडण्यात आलेल्या या आंदोलनाला विविध संघटनाकडून पाठींबा मिळत असुन किनवट तालुक्यातील या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा प्रश्न तात्काळ सोडवण्यात आला नाही. तर किनवट तालुक्याला तेलंगणा राज्यात समाविष्ठ करा हि मागणी सर्व पक्ष, संघटना कडुन करण्यात येऊन या प्रकरणी आक्रमक भुमिका घेण्यात येणार असल्याचे एक दरीत नागरीकाच्या मानसिकतेतून निदर्शनास येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.