ETV Bharat / state

या गावाला गेल्या 15 वर्षांपासून सरपंच नाही, गावकऱ्यांची आता मतदानावर बहिष्काराची भाषा - नांदेड

नांदेड जिल्हयात 18 डिसेंबर रोजी 181 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून (grampanchyat election in nanded) 19 ग्रामपंचायती बिन विरोध निवडून आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील वसराम नाईक तांडा ग्रामपंचायत मध्ये गावकऱ्यानी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. (villagers boycotting grampanchyat election)

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 17, 2022, 11:06 PM IST

गावकऱ्यांची आता मतदानावर बहिष्काराची भाषा

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील वसराम नाईक तांड्याला मागील 15 वर्षांपासून सरपंच नाही. (not had sarpanch for last 15 years). तसेच येथे मागील 10 वर्षांपासून ग्रामपंचायत सदस्य देखील नाही. त्यामुळे या गावाचा विकास खुंटला आहे. 1900 लोकवस्ती असलेल्या या गावात केवळ बांजारा समाजातील लोक राहतात. मागील 15 वर्षांपासून दर पंचवार्षिक निवडणुकीत या गावचे सरपंच पदाचे आरक्षण हे अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी सुटत आहे. त्यामुळे या गावाने मागील 15 वर्षांपासून सरपंच पाहिला नाही. त्यामुळे या गावाचा विकास झाला नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.(villagers boycotting grampanchyat election)

गावात केवळ बंजारा समाजाची वस्ती : 18 डिसेंबर रोजी जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. मात्र सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जमाती साठी सुटल्याने या गावात या प्रवर्गाचा एक ही व्यक्ती नसल्याने गावात निवडणूक लागली नाही. ज्या गावात बंजारा जाती शिवाय इतर कुठल्याही जातीचे रहिवासी नाहीत अशा गावचे सरपंच पदाचे आरक्षण हे इतर जाती साठी राखीव ठेवणे चुकीचे असून बंजारा जातीसाठीच आरक्षण सोडण्यात यावं अशी मागणी या गावकऱ्यांनी केली आहे. पण प्रशासनाने मात्र या प्रकारावर आज पर्यंत डोळेझाक केली आहे. जिल्ह्यात सर्वत्र निवडणूक होत असताना या तांड्यात मात्र ग्रामपंचायतची निवडणूक होत नाही आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.