ETV Bharat / state

'आधी केले मग सांगितले'... अशोक चव्हाणांनी स्वतः हटवले अनधिकृत बॅनर

नांदेडचे पालकमंत्री असलेले अशोक चव्हाण शनिवारी सकाळी नांदेड शहरात अ‌ॅक्शन मूडमध्ये दिसले. घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांना रस्त्याजवळ काँग्रेसचाच एक अनधिकृत बॅनर दिसला. चव्हाण यांनी लगेच आपला ताफा थांबवून तो बॅनर स्वतः काढून टाकला.

Ashok Shankarrao Chavan
अशोक चव्हाण
author img

By

Published : Jan 18, 2020, 1:49 PM IST

नांदेड - राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले अशोक चव्हाण, शनिवारी सकाळी नांदेड शहरात अ‌ॅक्शन मूडमध्ये दिसले. घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांना रस्त्याजवळ काँग्रेसचाच एक अनधिकृत बॅनर दिसला. चव्हाण यांनी लगेच आपला ताफा थांबवून तो बॅनर स्वतः काढून टाकला.

अशोक चव्हाणांनी स्वतः हटवले अनधिकृत बॅनर

हेही वाचा... बंडखोरांची 'स्थानिक आघाडी' वाढवणार महाविकास आघाडीची डोकेदुखी

नांदेड शहरात यापुढे अनधिकृत बॅनर लावू देणार नसल्याचे चव्हाण यांनी यावेळी सांगितले. अनधिकृत बॅनरमुळे शहराचे विदृपीकरण झाले आहे. त्यामुळे चव्हाण यांनी स्वतः पासून सुरुवात केली. त्यांनी आपल्याच पक्षाचा बॅनर हटवला आहे. कोणीही अनाधिकृत बॅनर लाऊ नये, असे आवाहनही चव्हाण यांनी यावेळी केले.

हेही वाचा... 'मला जर बेळगावमध्ये येण्यापासून रोखायचे असेल तर कायद्याने रोखावे'

दरम्यान, नांदेड मनपात काँग्रेसची एकहाथी सत्ता आहे. मात्र तरीही महानगरपालिका अकार्यक्षम बनल्याचे दिसत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बॅनर लावले जात असतात. या अनाधिकृत बॅनरमुळे शहरात अनेकदा अपघात देखील होत असतात. स्वतः चव्हाण यांनी या प्रकाराची दखल घेऊन स्वतःच्या पक्षाचा बॅनर हटवला. त्यानंतर झोपलेल्या मनपाला प्रशासनाला देखील जाग आली.

Intro:नांदेड : अशोक चव्हाण यांनी स्वतः हटवले अनाधिकृत बॅनर.

नांदेड : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आज सकाळीच ऍक्शन मूडमध्ये अवतरले. आज सकाळी घरातून निघताच रोडवर त्यांना काँग्रेसचे एक अनधिकृत बॅनर दिसले. चव्हाण यांनी लगेच आपला ताफा थांबवून ते बॅनर तिथून काढून टाकले.Body:नांदेड शहरात यापुढे अनधिकृत बॅनर लावू देणार नसल्याचे चव्हाण यांनी यावेळी सांगितले. अनधिकृत बॅनर मुळे शहराचे विद्रुपीकरण झालय. त्यामुळे चव्हाण यांनी आज स्वतः पासून सुरुवात करत आपल्याच पक्षाचे बॅनर हटवले आहे. कुणीही अनाधिकृत बॅनर लाऊ नये असं आवाहन चव्हाण यांनी यावेळी केलय. दरम्यान, नांदेड मनपात काँग्रेसची एकहाथी सत्ता आहे. मात्र तरीही मनपा अकार्यक्षम बनल्याने शहरात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बॅनर लावल्या जात असतात.Conclusion:
या अनाधिकृत बॅनरमुळे शहरात अनेकदा अपघात देखील होत असतात. मात्र बॅनरवरून चमकोगिरी करणाऱ्या मंडळींना याचे काही देणे घेणे नसते. आज स्वतः चव्हाण यांनी या प्रकाराची दखल घेऊन स्वतःच्याच पक्षाचे बॅनर हटवलय. त्या नंतर झोपलेल्या मनपाला देखील जाग आली आणि मनपाची यंत्रणा कामाला लागलीय. शहरातील अनाधिकृत बॅनर हटवण्यासाठी मनपाचे कर्मचारी कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.