ETV Bharat / state

नांदेड-भोकर रस्त्यावर ट्रॅक्टर उलटून दोन तरुणांचा मृत्यू - ट्रॅक्टर उलटून दोन तरुणांचा मृत्यू

नांदेड - भोकर रस्त्यावर ट्रॅक्टर उलटून दोन तरुणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रॅक्टरचालका विरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Two youths were killed when a tractor overturned on Nanded -Bhokar road
नांदेड - भोकर रस्त्यावर ट्रॅक्टर उलटून दोन तरुणांचा मृत्यू
author img

By

Published : Jun 4, 2021, 7:41 PM IST

नांदेड - जिल्ह्यातील नांदेड ते भोकर रस्त्यावरील खैरगावपाटी जवळील कॅनॉलजवळ शुक्रवारी दुपारी ट्रॅक्टर उलटून अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. आपघातातील मृत व्यक्ती सरेगाव (ता. मुदखेड) येथील आहे. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या अपघातात ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू झाला आहे.

ठार झालेले तरुण मुदखेड तालुक्यातील-

भोकर ते नांदेड रस्त्यावरील खैरगावपाटी परिसरातील तुकाराम पेट्रोलपंपाच्या समोरील कच्च्या रस्त्यावरून ट्रॅक्टर जात असताना अचानकपणे ट्रॅक्टर उलटून आपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टरखाली दबून तुषार सूर्यभान कळणे (वय 15, रा. सरेगाव, ता. मुदखेड) व पुरभाजी मारोतराव गिरे (वय 24) यांचा जागीच मृत्यू झाला.

बारड महामार्ग पोलीस घटनास्थळी मदत-

या आपघाताची माहिती मिळतातच बारड महामार्ग सुरक्षापथक घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने ट्रॅक्टरला क्रेनच्या सहाय्याने सरळ केले. या प्रकरणी तेजस गिरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.