नांदेड - पंढरपूर येथील कार्तिकी एकादशी निमित्त होणारी गर्दी लक्षात घेता पंढरपूर येथे जाण्यासाठी नांदेड रेल्वे विभागातून आदिलाबाद ते पंढरपूर आणि नांदेड ते पंढरपूर अशा दोन विशेष गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. असे दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने ठरविले आहे.
या विशेष रेल्वे गाड्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे .....
१) गाडी संख्या ०७५०१ आदिलाबाद येथून दिनांक ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १४:०० वाजता सुटेल आणि नांदेड, परभणी, परळी मार्गे पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:३० वाजता पोहोचेल.
२) गाडी संख्या ०७५२७ पंढरपूर येथून दिनांक ८ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता सुटेल आणि परळी, परभणी मार्गे नांदेड येथे २३.१५ वाजता पोहोचेल. पूर्वी ही गाडी पूर्णा पर्यंतच धावणार होती ती आत्ता नांदेड पर्यंत वाढविण्यात आली आहे.
३) गाडी संख्या ०७५२८ नांदेड येथून दिनांक ११ नोव्हेंबर रोजी रात्री १९.२० वाजता सुटेल आणि परभणी, परळी मार्गे पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:३० वाजता पोहोचेल. पूर्वी हि गाडी पूर्णा येथून सुटणार होती , ती आता नांदेड येथून सुटेल.
४) गाडी संख्या ०७५०२ पंढरपूर येथून दिनांक १२ नोव्हेंबर रोजी रात्री २२:०० वाजता सुटेल आणि परळी, परभणी, नांदेड मार्गे आदिलाबाद येथे येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १३:१५ वाजता पोहोचेल.