नांदेड - विवाहितेने आत्महत्या केल्या प्रकरणी तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात दोघांना अटक करून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. देवानंद वानखेडे व श्रीकृष्ण वानखेडे असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे.
अहमदपूर तालुक्यातील कुमठा येथील सौ. निकिता देवानंद वानखेडे या विवाहितेने विष्णुपुरी शिवारात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली होती. या प्रकरणी तिचे वडील नाना तायडे (रा. मनबदा, तेल्हारा अकोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पती देवानंद वानखेडे, श्रीकृष्ण वानखेडे, संगीता वानखेडे (रा. तरोडा खु. नांदेड) या तिघांनी तिला माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून सतत मानसिक व शारीरिक त्रास दिला. त्यामुळे तिने आत्महत्या केली. या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलिसांनी या तिघांविरुद्ध गुरनं ५४१/१९ कलम ४९८-अ, ३०४ ब, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी पती दयानंद व दीर श्रीकृष्ण यांना अटक करुन न्या.आर.पी. घोले यांच्यासमोर हजर केले असता त्यांना पाच नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
हेही वाचा- शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी; उद्धव ठाकरेंनी दिला शेतकऱ्यांना दिलासा