ETV Bharat / state

सहा तास दोरखंडाने बांधून मारहाण; सात जणांविरुद्ध गुन्हा - nanded crime news etwara

आयुब मोहम्मद जान, आयुब जब्बार अब्दुल इकबाल असे दोघे जण गाडीवर आले. त्यांनी कुरेशी यांना गाडीवर बसवून गोदावरी काठावर आणले. त्यानंतर गोदाकाठावर त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली तसेच रिजवान कुरेशी यांनाही मारहाण केली.

सहा तास दोरखंडाने बांधून मारहाण
सहा तास दोरखंडाने बांधून मारहाण
author img

By

Published : Feb 5, 2021, 1:26 AM IST

Updated : Feb 5, 2021, 3:11 AM IST

नांदेड - शहरातील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोदावरी नदीकिनारी तिघांना सहा तास दोरखंडाने बांधून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत होता. त्यानंतर या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहा तास दोरखंडाने बांधून मारहाण

लोखंडी रॉडने केली मारहाण-

मोहम्मद वाजीद कुरेशी बाबू कुरेशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून २७ जानेवारीला रात्री ८.३० वाजताच्या ने सुमारास अजीमोद्दीन डिलक्स फंक्शन हॉल येथे थांबलेले होते. यावेळी आयुब मोहम्मद जान, आयुब जब्बार अब्दुल इकबाल असे दोघे जण गाडीवर आले. त्यांनी कुरेशी यांना गाडीवर बसवून गोदावरी काठावर आणले. त्यानंतर गोदाकाठावर त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली तसेच रिजवान कुरेशी यांनाही मारहाण केली.

दोरखंडाने बांधून मारहाण केली...

मोकाट जनावरे पकडून त्याची कत्तल केल्याच्या रागातून ही मारहाण असावी, असा अंदाज सध्या व्हायरल व्हिडिओमधून दिसत आहे. दोरखंडाने बांधून ही मारहाण करण्यात येत होती. मारहाणीचा व्हिडिओ चित्रित करण्यात आला. त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. आता या प्रकरणात इतवारा पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पाच जणांना अटक कऱण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक निलेश मोरे यांनी दिली..

Last Updated : Feb 5, 2021, 3:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.