नांदेड - अर्धापूर पूर्व वळण रस्त्यावरील तामसा टी पॉईंटवर हिंगोलीकडून नांदेडकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास झाला. बालाजी गुणाजी कोकाटे (वय -40), पुंडलिक दामाजी शिंदे (वय 52, दोघेही रा. तिरकसवाडी, तालुका मुदखेड) अशी अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
हेही वाचा - माहूर शहरात अस्वलाचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
याबाबत अधिक माहिती अशी, की बालाजी आणि पुंडलिक हे त्यांच्या (एमएच-26- यूए- 5444) दुचाकीने अर्धापूरकडून तिरकसवाडीला जात असताना अर्धापूर पूर्व वळण रस्त्यातीवर तामसा टी पॉईंटवर हिंगोलीकडून नांदेडकडे जाणाऱ्या ट्रकने (एमएच-35-के-3690) धडक दिली. त्यावेळी बालाजी कोकाटे यांचा जागीच मृत्यू झाला. तर पुंडलिक शिंदे यांना उपचारासाठी नेत आसताना त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा - विधानसभा निवडणूक 2019 : खा.चिखलीकरांना दे धक्का... होमपीचवरची उमेदवारी शिवसेनेच्या वाट्याला..!
अपघातानंतर अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विष्णूकांत गुट्टे व महामार्ग सुरक्षा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख रहेमान व कर्मचारी व अधिकाऱ्यांना घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर त्यांनी वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, या वळण रस्त्यावर 4 चौक आहेत. या चौकात गतिरोधक, दिशादर्शक फलक नसल्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे याकडे बांधकाम विभाग व वाहतूक शाखेने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.