नांदेड - एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी बाप-लेकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या शहरातील मणियार गल्लीतील रहिवासी साजीद अब्दुल हमीद कुरेशी याने बळीरामपूर भागातील एका महिलेला आपल्या घरी बोलावले होते. ही महिला त्याच्या घरी गेली असता त्याने मला तुझ्याशी लग्न करावयाचे आहे. म्हणून वाईट हेतूने हात धरुन विनयभंग केला. तसेच तेवढ्यात त्याचे वडील अब्दुल हमीद कुरेशी तेथे आले. त्यानेही जबरीने तिचा हात धरला. तिला मारहाण करुन शिवीगाळ करीत लग्न केले नाही तर जिवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरुन इतवारा पोलिसांनी दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सुरु आहे.