नांदेड - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व वृक्षमित्र फाऊंडेशन तर्फे नांदेड शहर परिसरात हरित नांदेड अभियानांतर्गत गत दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या सहकार्याने वृक्ष लागवड मोहीम सुरू आहे. हरित नांदेड या योजनेच्या तिसर्या पर्वाचा शुभारंभ आज पर्यावरणदिनी 'एक व्यक्ती एक झाड' योजनेंतर्गत वृक्ष दत्तक योजनेद्वारे विसावा गार्डन परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाद्वारे झाला.
हेही वाचा - नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यांमध्ये कोरोना रुग्ण नाहीत, जिल्हा आरोग्य विभागाच्या प्रयत्नाला यश
वृक्ष संवर्धनाची जबाबदारी वृक्षप्रेमींवर
नांदेड शहरातील विविध भागांत मनपा व वृक्षमित्र परिवाराच्या वतीने वृक्षप्रेमींकडून गूगल फॉर्म भरून वृक्षारोपण हा उपक्रम घेण्यात आला होता. त्या सर्व वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी घेणार्या 200 नागरिकांना भाग्यनगर कमानीजवळ व मनपा मुख्य इमारतीच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते रोप मोफत भेट देण्यात आले. या रोपांचे पालकत्व स्वीकारून संवर्धनाची जबाबदारी वृक्षप्रेमींनी पार पाडावी, अशी शपथ घेण्यात आली. कोरोनाच्या सुरक्षा नियमावलीचे बंधन पाळून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
विविध मान्यवरांची उपस्थिती
या वृक्षलागवडीचा शुभारंभ महापौर मोहिनीताई येवनकर यांच्या हस्ते झाला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपमहापौर मसूद अहमद खान, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, महिला बालकल्याण सभापती संगीताताई पाटील-डक, उपसभापती गीतांजली हटकर, मनपा उपायुक्त शुभम क्यातमवार, नगरसेवक गड्डम, इनामदार, उद्यान अधीक्षक डॉ. मिर्झा फरहतुल्लाह बेग, वन परिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे, वृक्ष मित्र फाऊंडेशनचे संतोष मुगटकर, कैलाश अमिलकंठवार, सचिन जोड, प्रीतम भराडीया, गणेश साखरे, प्रल्हाद घोरबांड, अतुल डोणगावकर, प्रदीप मोरलवार, अनंत कुलकर्णी या सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
हेही वाचा - देश-विदेशातून मागणी वाढल्याने केळीच्या दरात सुधारणा; शेतकाऱ्यांमध्ये समाधान