ETV Bharat / state

नांदेडमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी केले आंदोलन; मानधन वाढवून विमा कवच देण्याची मागणी

नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी व इंटक आज (दि. 8 मे) विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केले आहे.

author img

By

Published : May 8, 2021, 8:50 PM IST

Updated : May 8, 2021, 10:29 PM IST

आंदोलक
आंदोलक

नांदेड - शासकीय रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी व इंटक आज (दि. 8 मे) काम बंद आंदोलन करत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले आहे. या डॉक्टरांना अवघ्या 11 हजार इतक्या विद्यावेतन काम करावे लागते, ही रक्कम वाढवावी, अशी या डॉक्टर मंडळींची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी आज राज्यातील सर्वच निवासी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले आहे. त्यात नांदेडचे सर्वच डॉक्टर सहभागी झाले. त्यामुळे रुग्ण सेवेवर याचा परिणाम झाला.

आंदोलक

विद्यावेतन अपुरे

नांदेडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशातच नुकतेच अंतिम वर्षातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रुग्णालयातील विविध वार्ड, आयसीयू, प्रयोगशाळा येथे रूजू होण्याचे आदेश आलेले आहेत. या सर्व परिस्थितीमध्ये आमच्या आरोग्याला मोठा धोका असून तरीही आम्ही आमच्या जीवाची बाजी लावून आपले कर्तव्य बजावयास तयार आहोत. पण, शासनातर्फे मिळणारे 10 हजार 800 विद्यावेतन आम्हाला आमच्या कामकाजाचे तास, आरोग्यास असलेला धोका आणि तणावपूर्ण वातावरण हे लक्षात ठेवता अपुरे वाटते, अशी तक्रार निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

50 हजार व बेड राखीव ठेवण्याचीही केली मागणी

मागील वर्षी पेक्षा भयावह परिस्थिती सध्या असल्यामुळे यावर्षी 50 हजार रुपये कोरोना मानधन आम्हाला मंजूर करावे व त्याच बरोबर आम्हाला शासनाकडून आरोग्य विमा संरक्षण कवच आणि कोरोना संक्रमण झाल्यास बेड उपलब्धता करून देण्यात येईल, अशा मागण्या केल्या आहेत. तसे लेखी आश्वासन द्यावे अन्यथा रूजू होणार नाही, असा पावित्रा घेत निवेदन या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी डॉ. शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना दिले आहे.

हेही वाचा - नांदेड : जिल्हा रुग्णालयात सिंगापूरचे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेंटर तातडीने रुग्णसेवेत वापरा, पालकमंत्र्यांचे निर्देश

Last Updated : May 8, 2021, 10:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.