ETV Bharat / state

नांदेडमध्ये तीन बाधित आढळले, जिल्ह्यातील रुग्णसंख्या 38 वर

author img

By

Published : May 8, 2020, 12:51 PM IST

पहिल्यांदा या तिघांचेही अहवाल नकारात्मक आले होते. पण कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दुसऱ्यांदा त्यांचे स्वॅब घेतला असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

three more tested positive for corona virus in nanded
नांदेडमध्ये तीन बाधित आढळले, जिल्ह्यातील रुग्णसंख्या 38 वर

नांदेड - अबचलनगर येथे सुरुवातीला आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या निकटवर्तीयांतील तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाने दिली. यापैकी एक महिला व दोन पुरुष असून त्यांचे वय ३५ ते ३८ च्या दरम्यान आहे. या नव्या बाधित व्यक्तींमध्ये रविनगर येथील एक जण असल्याने कोरोनाने शहरातील इतर भागातही पाय पसरवणे सुरू केल्याचे दिसून येत आहे.

पहिल्यांदा या तिघांचेही अहवाल नकारात्मक आले होते. पण कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दुसऱ्यांदा त्यांचे स्वॅब घेतला असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दुसरीकडे कोरोना आता कौठा भागातील रविनगरमध्येही पोहचला आहे. या वस्तीतील एक तरुणही कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. यामुळे कौठा परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा परिसर सील करून सहावा कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित केला जाणार आहे.

निगेटिव्ह पहिल्यांदाच झाले पॉझिटिव्ह -

आज आढळलेले तिघेही रुग्ण पंजाब येथून परतलेल्या अबचलनगरमधील चालकाच्या निकट संपर्कातील होते. त्यांचे स्वॅब पूर्वी घेतले असताना ते निगेटिव्ह होते. पण दुसऱ्यांदा स्वॅब घेतल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण असल्याचे आढळून आले. यामुळे कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे अहवाल पूर्वी जरी निगेटिव्ह आले असले तरी दुसऱ्या चाचणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ही बाब गंभीर असल्याचे मानले जाते. विशेष म्हणजे आज पॉझिटिव्ह आलेले व्यक्ती कुठे क्वांरटाईन होते की ते त्यांच्या घरी होते हे मात्र समजू शकले नाही.

गाफीलपणा नको-

निगेटिव्ह अहवाल आलेले व्यक्ती दुसऱ्यांदा घेतलेल्या स्वबमध्ये पॉझिटिव्ह आढळून आल्याने हा नवीन प्रकार प्रशासन आणि नागरिकांची डोकेदुखी वाढविणारा ठरणार आहे. हिंगोलीत देखील राज्य राखीव दलाचे निगेटिव्ह अहवाल आलेले २५ जवान दुसऱ्यांदा घेतलेल्या नमुन्यात पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. त्यामुळे बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा प्रथम अहवाल निगेटिव्ह आला तरी त्यांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक झाले आहे. तसेच प्रशासनाने त्यांना घरी न पाठवता रुग्णालयातील विलगीकरणात ठेवून त्यांच्यावर उपचार सुरू ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा संसर्गाचा फैलाव अधिक तीव्रतेने होऊ शकतो.

सहावा कंटेंटमेंट झोन-

यापूर्वी शहरातील पीरबु-हान नगर, अबचलनगर, नगिना घाट व आसपासचा परिसर, रहेमतनगर, अंबानगर सांगवी हे पाच परिसर कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित झाले आहेत. त्यात रवीनगर हा सहावा कंटेंटमेंट झोन असेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.