ETV Bharat / state

नांदेडमध्ये अत्यावश्यक सेवेआड दारूची वाहतूक; आरोग्य कर्मचाऱ्यासह तिघांना अटक - बेकायदेशीर दारु

नांदेड येथून देगलूरकडे जाणारे वाहन (कार क्रमांक एमएच. २६ व्ही. २६३५) पोलिसांनी थांबवले. वाहनाची तपासणी केली असता, त्यात विदेशी दारुच्या तब्बल २०० बाटल्या आढळून आल्या. नायगाव पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली आहे.

nanded police
नांदेडमध्ये अत्यावश्यक सेवेआड दारुची वाहतूक; तिघांना नायगाव पोलिसांकडून अटक
author img

By

Published : Jun 14, 2020, 9:30 AM IST

नांदेड - अत्यावश्यक सेवेचे स्टीकर लावून दारूची वाहतूक करणारे वाहन नायगाव पोलिसांनी पकडले आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, आरोपीमध्ये विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात कार्यरत कर्मचाऱ्याचा समावेश आहे. पोलिसांच्या या कारवाईने अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. नायगाव पोलीस हे मुख्य चौकात वाहनांची तपासणी करत होते. दरम्यान, त्यांना एका चारचाकी वाहन आढळून आले.

नांदेड येथून देगलूरकडे जाणारे वाहन (कार क्रमांक एमएच. २६ व्ही. २६३५) पोलिसांनी थांबवले. वाहनाची तपासणी केली असता, त्यात विदेशी दारुच्या तब्बल २०० बाटल्या आढळून आल्या. यावेळी कारमध्ये विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेला कर्मचारी सुरेश गोविंदराव गोपीनवार, उमेश आरेवार, सचिन रेगुलवाड (सर्व रा. हडको, नांदेड) हे प्रवास करत होते.

पोलिसांनी वाहन थांबवून चौकशी केली असता, आरोपी सुरेश गोपीनवार याची भंबेरी उडाली. घाबरलेल्या अवस्थेत कार्यक्रमासाठी जात असल्याची बतावणी त्याने केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबूली दिली. जप्त केलेल्या दारुची किंमत सव्वा लाख रुपये असल्याचे समजते. ही कारवाई नायगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. एस. पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीपती ढगे, विठ्ठल शेळके, विलास मुस्तापुरे, संदीप कुलकर्णी, सोपान वळगे आदींच्या पथकाने केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.