ETV Bharat / state

पोलिसांवर हल्ला करणाऱ्या 'त्या' आरोपींची कुठल्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही - प्रमोद कुमार शेवाळे

author img

By

Published : Mar 30, 2021, 5:26 PM IST

पोलिसांवर हल्ला करणाऱ्या 'त्या' आरोपींची कुठल्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही, असे पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे म्हणाले. ते नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.

Those who attacked the police will not be released under any circumstances, Superintendent of Police Shewale said
पोलिसांवर हल्ला करणाऱ्या 'त्या' आरोपींची कुठल्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही - प्रमोद कुमार शेवाळे

नांदेड - पोलिस अधिक्षक धुलिवंदनाच्या दिवशी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर केलेल्या हल्ल्याच्या अनुषंगाने कोणाचीही गय केली जाणार नाही. सदर प्रकरणातील दोषींना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणात ३०० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून ६० जणांची सीसीटिव्ही फुटेजवरुन ओळख पटविण्यात येत आहे . या प्रकरणात १८ जणांना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी दिली. ते नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.

यावेळी पोलीस अधीक्षक पुढे बोलताना म्हणाले की, नांदेड येथील श्री सचखंड गुरुद्वाराच्या वतीने दरवर्षी धुळवडीच्या दिवशी पारंपारिक पद्धतीने हातात उघडी शस्त्रे प्रतिकात्मक हल्ला बोल मिरवणुक काढण्यात येते. मात्र, यंदा लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मिरवणुकीसाठी परवानगी नाकारली होती. सोमवारी सायंकाळी चार वाजता गुरुद्वारात आरती झाल्यानंतर मात्र तरुण भाविकांचे जत्थे हातात उघड्या तलवारी घेवून मिरवणुक गुरुद्वाराच्या बाहेर घेवून आले. यावेळी पोलिसांनी अटकाव करताच त्यांच्यावर भाला आणि तलवारीने हल्ला करण्यात आला. यामध्ये आठ पोलिस कर्मचारी जखमी झाले असून पोलिसांच्या आठ वाहनांचे नुकसान झाले आहे.

काही तरुण ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते -

लॉकडाऊन असल्यामुळे यंदा मिरवणुकीला परवानगी नाकारली होती. मिरवणुक काढू नये म्हणून जिल्हाधिकारी विपीन ईटणकर आणि मी गुरुद्वाराची प्रशासकीय समिती व संत बाबा कुलवंतसिंगजी, संत बाबा बलविंदरसिंगजी यांच्याशी चर्चा केली होती. सर्वांनी त्यावेळी मिरवणुक काढणार नसल्याचे स्पष्ट केले. या बद्दल समाजाला आवाहनही केले होते. मात्र, २९ मार्च धुळवडीच्या दिवशी सायंकाळी चार वाजता अरदास झाल्यानंतर गुरुद्वाराच्या आत हल्ला बोल मिरवणुक काढण्यात आली. यावेळी काही अतिउत्साही तरुणानी मिरवणुक गुरुद्वाराच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी धर्मगुरुंनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीच ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हते.

अनेक नियमांचे उल्लंघन केले -

पोलिसांना होती पूर्वसुचना मागील वर्षी लॉकडाऊन असताना न्यायालयाच्या परवानगीने दसऱ्यानिमित्त गुरुद्वारातून मिरवणुक काढण्यात आली होती . मात्र, त्यावेळी मोठा गोंधळ उडाला होता . मिरवणुकीत मास्क वापरण्यात आले नव्हते. सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला होता. पोलिसांसोबत धक्काबुक्कीचा प्रकारही घडला होता. यावेळीही तसाच काहीसा प्रकार होणार याची पूर्वसुचना होती, अशी कबुली पोलिस अधीक्षक शेवाळे यांनी दिली.

तीनशे ते चारशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल तर अठरा जणांना अटक -

नांदेड शहरातील शीख भाविकांच्या हल्ला-महल्ला मिरवणुकी दरम्यान पोलिसांवर हल्ला करणाऱ्या त्या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी युद्ध पातळीवर मोहीम हाती घेतली असून चारशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पैकी साठच्या आसपास नाव ओळखण्यात पोलिसांना यश आले असून आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री उशिरा चारशे जणांवर विविध कलमाखाली गुन्हा दाखल करून अठरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरुद्वारा परिसर व शहरात शांतता असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, असे पोलीस अधीक्षक शेवाळे यांनी यावेळी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.