ETV Bharat / state

Independence Day : प्रमुख सरकारी कार्यालयांवर फडकतो 'नांदेडचा राष्ट्रध्वज' - manufactures the national flag

देशाच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती (Creation of national flag in Nanded city) मोठ्या प्रमाणावर नांदेडमध्ये केली जाते. नांदेडमध्ये बनवलेले ध्वज देशभर फडकवले (India national flag tricolor) जातात. मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती (Nanded Khadi Village Industries Committee) राष्ट्रध्वज निर्माण करण्याचे काम करते.

Independence Day
Independence Day
author img

By

Published : Aug 12, 2023, 5:16 PM IST

Updated : Aug 12, 2023, 5:31 PM IST

नांदेड : येथील खादी ग्रामोद्योग समितीने (Nanded Khadi Village Industries Committee) उत्पादित केलेला राष्ट्रध्वज देशभरात फडकवला जातो. राष्ट्रीय राजधानीतही नांदेडहून राष्ट्रध्वज पुरवले जातात. त्यामुळे राजधानीतील काही कार्यालयांवर नांदेडहून पुरवलेला राष्ट्रध्वज फडकवले जातात. नांदेड शहरातून राष्ट्रध्वज (India national flag tricolor) संपूर्ण देशातील विविध भागात पाठवला जातो, असे मराठवाडा खादी ग्रामोद्योग मंडळाचे संचालक महाबळेश्वर मठपती यांनी सांगितले. मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या माध्यमातून नांदेड शहरात राष्ट्रध्वजाची निर्मिती (Creation of national flag in Nanded city) केली जाते. ज्यामध्ये दहा वेगवेगळ्या आकाराचे राष्ट्रध्वज तयार केले जातात. राष्ट्रध्वजासाठी वापरण्यात येणारे कापड लातूर जिल्ह्यातील उदगीर येथून आणले जाते.

6 हजार 559 राष्ट्रध्वजांची विक्री : राष्ट्रध्वज बनवणारी मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती ही नांदेडची ऐतिहासिक संघटना आहे. लाल किल्ल्याशिवाय इतर अनेक राज्यांमध्येही ही संस्था राष्ट्रध्वजाचा पुरवठा करते. यावर्षी आतापर्यंत 9 हजार 19 राष्ट्रध्वज बनवण्यात आले आले आहेत. यामध्ये 6 हजार 559 राष्ट्रध्वजांची विक्री करण्यात आली आहे.

देशभरात ४ ठिकाणी राष्ट्रध्वज बनवले जातात. सरकारी कार्यालयांना नांदेडमध्ये बनवलेले राष्ट्रध्वज दिले जातात. मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती ही नांदेडची ऐतिहासिक संस्था आहे. ही संस्था राष्ट्रध्वज निर्मितीसाठी देशभरातील मोजक्या केंद्रांपैकी एक आहे. - महाबळेश्वर मठपती, संचालक मराठवाडा खादी ग्रामोद्योग

संस्थेला 25 कोटींचा निधी : 1967 मध्ये स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ, पद्मभूषण गोविंदभाई श्रॉफ यांनी 1967 मध्ये स्थापन केलेल्या आणि नंतर शंकरराव चव्हाण यांनी पालनपोषण केलेल्या या संस्थेचा कायापालट करण्याचा निर्णय नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. ज्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने या इमारतीच्या कायापालटासाठी २५ कोटी रुपये दिले होते. मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती केंद्र हे केवळ खादी उत्पादनांचे उत्पादन केंद्र नाही, तर भावी पिढ्यांना प्रेरणा देणारे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते.

हेही वाचा -

  1. Independence Day : पुण्यातील शेख कुटुंबीय 50 वर्षांपासून बनवतायेत 'तिरंगा'; व्यवसाय नव्हे तर देशसेवा...
  2. August Kranti Din: साताऱ्याच्या कॉम्रेडने केलेल्या चित्रिकरणामुळे ऑगस्ट क्रांतीच्या आठवणी आजही जिवंत
  3. Sambhaji Bhide : '15 ऑगस्ट खरा स्वातंत्र्य दिन नाही, या दिवशी दुखवटा पाळा', संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य

Last Updated : Aug 12, 2023, 5:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.